---Advertisement---

कांगारूंचा विजयाने श्रीगणेशा; अखेरच्या षटकात दक्षिण आफ्रिकेवर रोमहर्षक विजय

On: शनिवार, ऑक्टोबर 23, 2021 7:31 PM
---Advertisement---

सातव्या टी२० विश्वचषकाला शनिवारपासून (२३ ऑक्टोबर) पासून सुरुवात झाली. पात्रता फेरीनंतर सुपर १२ फेरीचा पहिला सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रीका असा रंगला. अबूधाबी येथील शेख झायेद क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या रोमांचक सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाच गडी राखून विजय मिळवला. याच बरोबर त्यांनी आपल्या विश्वचषक मोहिमेचा प्रारंभ विजयाने केला. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांची हाराकिरी
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरॉन फिंच याने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेरक्षण करण्याचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेसाठी कर्णधार टेंबा बवुमा व क्विंटन डी कॉक यांनी सलामी दिली. मात्र, ऑस्ट्रेलियाच्या सर्वच गोलंदाजांनी उत्कृष्ट गोलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेला मोठी धावसंख्या रचण्यापासून दूर ठेवले. प्रमुख फलंदाज एडेन मार्करमने ४० व कगिसो रबाडाने १९ धावा करून दक्षिण आफ्रिकेचा डाव ९ बाद ११८ पर्यंत पोहोचविला. ऑस्ट्रेलियासाठी मिचेल स्टार्क, जोश हेजलवूड व ऍडम झंपा यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले.

दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी आणली सामन्यात रंगत
दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या ११९ धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. फिंच खाते न खोलता माघारी परतला‌. डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ व ग्लेन मॅक्सवेल यांनी अनुक्रमे १४, ११, ३४ व १८ धावा करून ऑस्ट्रेलियाला विजयाकडे नेले. मॅथ्यू वेड व मार्कस स्टॉयनिस यांनी अखेरपर्यंत संयम राखत सामना ऑस्ट्रेलियाच्या बाजूनेच ठेवला. अखेरच्या षटकात विजयासाठी ८ धावांची आवश्यकता असताना स्टॉयनिसने दोन चौकार खेचत दोन चेंडू व पाच गडी राखून ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने आपल्या मोहिमेची सुरवात विजयाने केली.

दुसऱ्या सामन्यात भिडणार इंग्लंड आणि वेस्ट इंडिज
दिवसातील दुसऱ्या सामन्यात इंग्लंड आणि वेस्ट इंडिज संघ आमने सामने येथील. याच दोन संघांमध्ये २०१६ विश्वचषकाचा अंतिम सामना झाला होता. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार ओएन मॉर्गनने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाप्रमाणे विजय सुरुवात करण्याचा या दोन्ही संघांचा मानस असेल.

महत्त्वाच्या बातम्या-

‘युवराजला वाटले श्रीसंत कदाचित झेल सोडेल’, रोहितने दिला २००७च्या अंतिम सामन्याच्या आठवणींना उजाळा

भारत-पाक सामन्याची उत्सुकता शिगेला! रेस्टोरंट, बारसह चहाच्या स्टॉलवरही चाहत्यांना मिळणार सूट

भारताविरुद्धच्या ‘हाय व्होल्टेज’ लढतीसाठी पाकिस्तानचा संघ जाहीर, पाहा कोण इन कोण आऊट

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---