रविवारी (२७ मार्च) दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सला पराभूत करून आयपीएल २०२२ हंगामाची सुरुवात गोड केली. परंतु एक अशी बातमी समोर आली आहे, ज्यामुळे दिल्लीच्या विजयाचा आनंद खूप लवकर फिका पडला. ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू मिशेल मार्श (Mitchell Marsh) याला दिल्ली कॅपिटल्सने मेगा लिलावात ६.५ कोटी रुपयांमध्ये खरेदी केले आहे, पण तो आगामी आयपीएल हंगाम खेळण्याविषयी संभ्रम निर्माण झाला आहे.
ऑस्ट्रेलिया संघ मागच्या काही दिवसांपासून पाकिस्तान दौऱ्यावर आहे. पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका २९ मार्चपासून खेळली जात आहे. त्यांनंतर उभय संघातील एकमात्र टी-२० सामना ५ एप्रिलला खेळला जाईल आणि ६ एप्रिल रोजी सर्व ऑस्ट्रेलियन संघ आयपीएलसाठी भारतात दाखल होतील. मिशेल मार्शही सर्व ऑस्ट्रेलियन खेळाडूंसोबत भारतात दाखल होणार होता, पण आता सर्व नियोजनाप्रमाणे होण्याची शक्यता खूप कमी आहे.
सराव सत्रात झालेल्या दुखापतीमुळे मार्श पाकिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून बाहेर झाला आहे. आता तो आयपीएल २०२२ हंगामा दिल्ली कॅपिट्लचे प्रतिनिधित्व करू शकले, याची कसलीही खात्री देता येऊ शकणार नाही. एकदिवसीय मालिका संपल्यानंतर मार्श भारतासाठी रवाना होणार होता, पण आता याविषयी संभ्रम निर्माण झाला आहे. आयपीएलमधील त्याची उपलब्धता त्याच्या दुखपतीवर अवलंबून आहे. ऑस्ट्रेलियाचा मर्यादित षटकांचा कर्णधार ऍरॉन फिंचने मार्शच्या दुखापतीविषयी माहिती दिली.
ऍरॉन फिंचने (Aaron Finch) म्हटल्याप्रमाणे, मार्श रविवारी क्षेत्ररक्षणाचा सराव करताना दुखापतग्रस्त झाला होता. त्याचा स्कॅन केला गेला आहे, जे चाचणीसाठी पाठवले आहे. फिंच पत्रकारांना म्हणाला, “त्याला दुखापत झाली आहे. आम्हाला वाटत आहे की, त्याला सराव करताना दुखापत झाली. आम्हाला वाट पाहावी लागेल आणि पाहावे लागेल की, त्याची स्थिती कशी आहे, पण काल त्याची स्थिती जशी होती, त्यावरून आम्हाला नाही वाटत की, तो या मालिकेत खेळू शकेल.”
मार्च मागच्या वर्षी टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये ६२७ धावा करून एका वर्षात सर्वाधिक धावा करणारा ऑस्ट्रेलियन बनला होता. त्याने आतापर्यंत २१ आयपीएल सामने खेळले आहेत आणि यामध्ये २० विकेट्ससह २२५ धावाही केल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या –
WI vs Eng| वेस्ट इंडीजकडून इंग्लंडला तब्बल १० विकेट्सने पराभवाचा दणका, मालिकेवरही कब्जा
काय आहे कसोटी सामन्यातील सर्वात कमी स्कोर? ‘या’ संघाला ३० धावाही करता आल्या नव्हत्या
ग्लेन मॅक्सवेलचे लागले भारतीय पद्धतीने लग्न, वरमाळा घालतानाचा Video तुफान व्हायरल