ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथ हा क्रिकेट जगतातील दिग्गज खेळाडूंपैकी एक आहे. कसोटी क्रिकेट प्रकारामध्ये त्याची आकडेवारी प्रभावी आहे. स्मिथची ऑस्ट्रेलिया तसेच इतर देशांतील फलंदाजीची शैली उत्कृष्ट आहे आणि त्याचे आकडे भारतातही चांगले आहेत. अशात सध्या त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो भारतात खेळण्याच्या अनुभवाबाबत सांगत आहे.
स्टीव स्मिथ (Steve smith) याचा हा व्हिडिओ स्टार स्पोर्ट्सने शेअर केला आहे. यामध्ये त्याला भारतात खेळण्याच्या अनुभवाविषयी विचारण्यात आले. यावर उत्तर देताना तो म्हणाला, “भारतातील लोकांना क्रिकेट पाहण्यास खूप आवडते. भारतात क्रिकेट खेळण्याचा अनुभव खूप चांगला आहे. या ठिकाणच्या मैदानावर खेळताना फलंदाज म्हणून एक वेगळाच जोश येतो. मला भारतात खेळायला खूप आवडते.”
https://twitter.com/StarSportsIndia/status/1687455852826120192?s=20
अलीकडेच पार पडलेल्या इंग्लंडविरुद्धच्या ऍशेस 2023 (Ashes 2023) मालिकेत स्मिथ खेळताना दिसला होता. या मालिकेत ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक धावा करणारा तो दुसरा फलंदाज ठरला. स्मिथने 5 सामन्यांमध्ये 373 धावा केल्या. यादरम्यान त्याने उत्कृष्ट फलंदाजी करत एक शतक आणि दोन अर्धशतकांची खेळी केली.
विश्वचषक 2023च्या आधीच ऑस्ट्रेलियन संघ येणार भारत दौऱ्यावर
विश्वचषक 2023 यावेळी भारतात होणार आहे. 5 ऑक्टोबरपासून ही स्पर्धा सुरू होऊन 19 नोव्हेंबरला या स्पर्धेचा शेवटचा सामना खेळला जाणार आहे. या विश्वचषकापूर्वीच ऑस्ट्रेलियन संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघात 3 सामन्यांची वनडे मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेची सुरुवात 22 सप्टेंबरपासून होणार आहे.
विश्वचषक संपल्यानंतर ऑस्ट्रेलिया संघ भारत दौऱ्यावरील उर्वरित 5 टी20 सामन्यांची मालिका खेळेल. या टी20 मालिकेची सुरुवात 23 नोव्हेंबरला होणार आहे. तसेच, याचा शेवटचा सामना हैदराबादमध्ये 3 डिसेंबर रोजी खेळला जाईल. (australian batsman steve smith tells about his experience playing in india)
महत्वाच्या बातम्या:
ब्रेकिंग! पाकिस्तानचे माजी कर्णधार इम्रान खान यांना 3 वर्षांची शिक्षा, काय आहे नेमकं प्रकरण?
विराटने ज्या गोलंदाजाला चोपले, कार्तिकने त्याचेच गायले गोडवे; म्हणाला, ‘तो डेथ ओव्हर स्पेशलिस्ट…’