---Advertisement---

ऑस्ट्रेलियन फलंदाज ट्रेविस हेडने केली सुखी संसाराला सुरुवात, प्रेयसी जेसिकासोबत बांधली लग्नगाठ

On: सोमवार, एप्रिल 17, 2023 1:07 PM
Travis Head Jessica Davies
---Advertisement---

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा अनुभवी फलंदाज ट्रेविस हेड याने आपली प्रेयसी जेसिका डेव्हिससोबत लग्नगाठ बांधली. मागच्या मोठ्या काळापासून ट्रेविस हेड आणि जेसिका डेव्हिस एकत्र होते. रविवारी (16 एप्रिल) ट्रेविस आणि जेसिका यांनी एडिलेडमध्ये लग्न केले. आपल्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून दोघांनी लग्नातील फोटो शेअर केले आहेत.

ट्रेविस हेड आणि जेसिका डेव्हिस यांनी बऱ्याच दिवसांपूर्वी साखरपुडा उरकला होता. या दोघांना लग्नाआधी एक मुल देखील आहे. जेसिका डेव्हिस () हिने आपल्या सोशल मीडिया खात्यावून सेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले की, “मी माझे राहिलेले आयुष्य तुझी पत्नी म्हणून घालवण्यासाठी वाट पाहू शकत नाहीये.” दरम्यान ही पोस्ट ऑस्ट्रेलियन चाहत्यांसह जगभारातील क्रिकेटप्रेमींमध्ये व्हायरल होत आहे. चाहत्यांकडून दोघांनी सुखी संसाराच्या शुभेच्छा मिळत आहेत.

https://www.instagram.com/p/CrID_fHLorb/?utm_source=ig_web_copy_link

दरम्यान, ट्रेविस हेडने 2016 साली ऑस्ट्रेलियासाठी टी-20 आणि वनडे पदार्पण केले. आपला पहिला कसोटी सामना खेळण्यासाठी त्याला 2018 पर्यंत पाट पाहावी लागली. पण तोन ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचा महत्वाचा भाग 2021 नंतर बनला. त्याने 2021 मध्ये ऑस्ट्रेलियन संघात पुनरागमन केले आणि रेड बॉल क्रिकेटमध्ये आपली गुणवत्ता सिद्ध केली.

त्याने ऑस्ट्रेलियासाठी हेडने आतापर्यंत 36 कसोटी, 54 वनडे आणि 17 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने 2361, वनडे क्रिकेटमद्ये 1912, आणि टी-20 क्रिकेटमध्ये 345 धावा केल्या आहेत. या तिन्ही फॉरमॅटमध्ये त्याने 7, 14 आणि 1 अशा विकेट्स देखील मिळवल्या आहेत. आयपीएल 2023 साठी झालेल्या लिलिवात हेडने 2 कोटी रुपयांच्या बेस प्राईसह आपले नाव नोंदवले होते. मात्र त्याला खरेदी करण्यासाठी एकही संघ दोन कोटी रुपये खर्च करू इच्छित नव्हता. परिणामी तो अनसोल्ड राहिला आणि आयपीएलच्या चालू हंगामात खेळू शकला नाही.यापूर्वी त्याने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्स याआयपीएल संघांचे प्रतिनिधित्व केले आहे.(Australian batsman Travis Head started a happy life, tied the knot with his girlfriend Jessica)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-

“गांगुलीला हे सोपे वाटले असेल”, दिल्लीच्या पराभवानंतर भारतीय दिग्गजाकडून कानउघडणी
अर्जुनच्या पदार्पणानंतर सचिनची भावनिक पोस्ट! मनातील भावना व्यक्त करताना लिहिले, ‘तुझा बाबा म्हणून…’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---