भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात आगामी बाॅर्डर-गावसकर ट्राॅफी (Border Gavaskar Trophy) मालिका खेळली जाणार आहे. त्यासाठी मालिकेचे वेळापत्रक देखील जाहीर केले आहे. बाॅर्डर गावसकर ट्राॅफीमध्ये दोन्ही संघात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. दोन्ही संघ पहिल्या सामन्यासाठी (22 नोव्हेंबर) पर्थ येथे आमने-सामने असणार आहेत. तत्पूर्वी ऑस्ट्रेलिया कर्णधार पॅट कमिन्सने (Pat Cummins) कोणत्या भारतीय खेळाडूची भिती वाटते हे सांगितले आहे.
पॅट कमिन्स (Pat Cummins) स्टार स्पोर्ट्सशी बोलताना म्हणाला, “मी जसप्रीत बुमराहचा खूप मोठा चाहता आहे. माझ्या मते तो एक दिग्गज गोलंदाज आहे. जर आम्ही त्याला रोखण्यात यशस्वी झालो, तर मालिका जिंकणे आमच्यासाठी खूप सोपे होणार आहे. आम्ही भारताविरूद्ध शेवटच्या 2 मालिका खेळलो होतो, आता त्याला खूप वेळ झाला आहे. आम्ही त्या पराभवातून बाहेर पडलो आहे.”
पुढे बोलताना कमिन्स म्हणाला की, “मी रोहित शर्मासोबत एका संघात कधी खेळलो नाही. त्यामुळे मी त्याच्याबद्दल त्याच्या भूमिकेबद्दल फार काही बोलू शकत नाही. पण असं वाटत आहे, की भारतीय संघ खूप भक्कम आहे. त्यांची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही काही वर्षापूर्वी जागतिक कसोटी चॅम्पियनशिप फायनल आणि एकदिवसीय विश्वचषक जिंकण्यात यशस्वी राहिलो. त्याचीच प्रेरणा आम्ही इथून पुढे घेणार आहोत.”
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs NZ; कसोटी सामन्यापूर्वीच कर्णधाराचे मोठे वक्तव्य! म्हणाला…
जामनगरचा वारस झाला भारताचा ‘हा’ माजी खेळाडू! संपत्तीच्या बाबतीत कोहलीला टाकलं मागे
IND vs NZ; कसोटी मालिकेपूर्वीच भारताला मोठा धक्का! स्टार खेळाडूच्या खेळण्यावर सस्पेन्स