मेलबर्न। आजपासून(26 डिसेंबर) ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात तिसरा कसोटी सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर सुरु झाला आहे. या सामन्यात भारताने पहिल्या दिवसाखेर पहिल्या डावात 89 षटकात 2 बाद 215 धावा केल्या आहेत.
भारताकडून या सामन्यात मयंक अगरवालने पहिल्याच कसोटी सामन्यात खेळताना 161 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारांच्या सहाय्याने 76 धावांची अर्धशतकी खेळी केली आहे.
यावेळी समालोचन कक्षात केरी कीफ आणि शेन वार्न हे मयांक अगरवालबद्दल चर्चा करत होते. मार्क होवार्डदेखील समालोचन कक्षात होते. यावेळी चर्चेदरम्यान केरी कीफ भारतीय प्रथम श्रेणी क्रिकेटच्या दर्जाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
तसेच मयांकने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये केलेली खेळी कॅटींनमधील कर्मचाऱ्यांच्या किंवा हाॅटेमध्ये काम करणाऱ्या वेटरसोबत केली असल्याचे भाष्य केले.
यानंतर समालोचन कक्षात आलेल्या मार्क वाॅही मयांकवर अतिशय खराब टीपण्णी केली. त्याची प्रथम श्रेणीमधील सरासरी भारतात ५० आहे. जी ऑस्ट्रेलियाचा विचार करता जेमतेम ४० आहे. असे यावेळी मार्क वाॅ म्हणाला.
भारताकडून ऑस्ट्रेलियात कसोटी पदार्पण करताना सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत मयांक अव्वल स्थानी आहे.
मयांक अगरवालने ४६ प्रथम श्रेणी सामन्यात ४९.९८च्या सरासरीने ३५९९ धावा केल्या आहेत तर अ दर्जाच्या ७५ सामन्यात ४८.७१च्या सरासरीने ३६०५ धावा त्याने केल्या आहेत.
ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी पदार्पणाच्या सामन्यात सर्वाधिक धावा करणारे भारतीय खेळाडू –
76 धावा – मयंक अगरवाल
66 धावा – सईद अबीद अली
56 धावा – हृषीकेश कानेटकर
53 धावा – दत्तू फडकर
33 धावा – जवागल श्रीनाथ
महत्त्वाच्या बातम्या:
–जेव्हा खेळाडू नाही तर प्रेक्षकच करतात कसोटी सामन्यात विक्रम
–मयंक अगरवाल असा पराक्रम करणारा केवळ पाचवा भारतीय सलामीवीर फलंदाज
–पदार्पणाच्या सामन्यात शानदार अर्धशतक करणाऱ्या मयंक अगरवालने केला हा खास विक्रम