क्रिकेट जगतात असे अनेक खेळाडू आहेत, ज्यांची लोकप्रियता त्यांच्याच देशातच नाही, तर जगभरात पसरली आहे. यामध्ये ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू डेविड वॉर्नर याच्या नावाचाही समावेश होतो. वॉर्नरचा भारतात मोठा चाहतावर्ग आहे. तो भारताला आपले दुसरे घर मानतो. भारतीय चित्रपट, गाणी आणि डायलॉग्जवर तो व्हिडिओ बनवतो, ज्यामुळे चाहत्यांचा तो आवडता बनला आहे. अशात पुन्हा एकदा वॉर्नरने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. वॉर्नरने टॉलिवूड सुपरस्टार अल्लू अर्जुन याचे अभिनंदन केले आहे.
खरं तर, गुरुवारी (दि. 24 ऑगस्ट) अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार जिंकणारा अल्लू अर्जुन पहिला तेलुगू अभिनेता बनला आहे. त्याला 69व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (69th National Film Awards) सोहळ्यात त्याच्या ‘पुष्पा: द राईज’ (Pushpa: The Rise) या सिनेमातील दमदार अभिनयासाठी हा पुरस्कार देण्यात आला.
काय म्हणाला वॉर्नर?
वॉर्नरला टॉलिवूड इंडस्ट्रीत किती रस आहे, हे त्याच्या व्हिडिओमधून वेळोवेळी दिसून आले आहे. तो ‘पुष्पा’ (Pushpa) सिनेमातील प्रसिद्ध डायलॉग ‘झुकेगा नहीं साला’ यावर व्हिडिओ बनवताना दिसला आहे. त्याच्या या व्हिडिओंना भारतीय प्रेक्षकांनीही भरभरून प्रेम दिले आहे. अशात इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करत डेविड वॉर्नरने अल्लू अर्जुनचे अभिनंदन केले. स्टोरीमध्ये त्याने अभिनेत्याला टॅग करत म्हटले की, “अभिनंदन अल्लू अर्जुन. शाब्बास.”
Instagram story by David Warner, Congratulating Allu Arjun for winning the National Award.
– Allu Arjun is a favourite for everyone. pic.twitter.com/ATz8ngtg45
— Johns. (@CricCrazyJohns) August 25, 2023
वॉर्नरची विश्वचषक संघात निवड
यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात होणाऱ्या विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाने 18 सदस्यीय संघ निवडला आहे. या संघात स्थान मिळवण्यात डेविड वॉर्नरला यश आले आहे. मात्र, वॉर्नर सध्या धावांचा डोंगर उभारण्यात संघर्ष करताना दिसतोय. अलीकडेच पार पडलेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यातही त्याला खास प्रदर्शन करता आले नव्हते.
https://www.instagram.com/p/CwVZpz8BMA4/
वनडे विश्वचषक 2023 (ODI World Cup 2023) स्पर्धेतील अभियानाला ऑस्ट्रेलिया 8 ऑक्टोबरपासून सुरुवात करणार आहे. हा सामना भारताविरुद्ध चेन्नईच्या चेपॉक मैदानावर पार पडणार आहे. विशेष म्हणजे, आयसीसी नियमांनुसार, सर्व संघांना 28 सप्टेंबरपूर्वी आपला संघ निश्चित करावा लागणार आहे.
विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाचा प्राथमिक संघ
पॅट कमिन्स (कर्णधार), सीन ऍबॉट, ऍश्टन एगर, ऍलेक्स कॅरी, नेथन एलिस, कॅमरून ग्रीन, ऍरॉन हार्डी, जोश हेझलवूड, ट्रेविस हेड, जोश इंग्लिस, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, तन्वीर संघा, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉयनिस, डेविड वॉर्नर, ऍडम झम्पा. (Australian cricketer david warner congratulates allu arjun for winning national award)
हेही वाचा-
बोंबला! ‘यो-यो’ टेस्टचा स्कोर शेअर करणे विराटच्या अंगलट, BCCIने झाप झाप झापलं
World Cup 2023मध्ये ‘हा’ फलंदाज करणार सर्वाधिक धावा, दक्षिण आफ्रिकेच्या महान खेळाडूची भविष्यवाणी