आशिया चषक 2023 स्पर्धेकडे आशिया खंडासोबतच जगभरातील सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. या स्पर्धेला 30 ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. स्पर्धेपूर्वी संघ जोरदार तयारी करताना दिसत आहेत. भारतीय संघाने बंगळुरूच्या अलूर येथे विशेष शिबिरात भाग घेतला. पाच दिवसांच्या कालावधीत बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली सर्व खेळाडू फिटनेस टेस्ट देत आहेत. गुरुवारी (दि. 24 ऑगस्ट) भारतीय संघाचा स्टार खेळाडू विराट कोहली यो-यो टेस्ट पास झाल्यानंतर खूपच खुश झाला. त्याने यादरम्यानचा फोटो सोशल मीडयावर शेअर केला. मात्र, आता असे करणे विराटच्या अंगलट आले आहे. बीसीसीआयने विराटला खडसावले आहे.
खरं तर, भारताचा स्टार खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) याने बंगळुरूत यो-यो टेस्ट (Yo-Yo Test) पास करून आपला फिटनेस सिद्ध केला. फिटनेस टेस्ट पास झाल्यानंतर विराटने इंस्टाग्रामवर यो-यो टेस्टदरम्यानचा आपला एक फोटो शेअर केला होता. विराटने यो-यो टेस्ट पास केल्यानंतर आपला आनंद व्यक्त केला. त्याने इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिले होते की, “खतरनाक कोनांच्या मध्ये यो-यो टेस्ट संपवण्याचा आनंद.” यासोबतच त्याने आपले गुणही सांगितले. त्याने “17.2 डन” असे लिहिले. खरं तर, यो-यो टेस्ट पास करण्यासाठी 16.5 गुण आवश्यक असतात. अशात बीसीसीआयने त्याला झापले आहे.
बीसीसीआयने फटकारले
माध्यमांतील वृत्तांनुसार, विराटने यो-यो टेस्ट स्कोर शेअर केल्यानंतर बीसीसीआयने इतर खेळाडूंना यो-यो टेस्टचा स्कोर शेअर करण्यावर बंदी घातली आहे. विराटचे स्कोर शेअर करणे करारातील कलमांचा भंग मानले जात आहे. बीसीसीआयने फोटो शेअर करण्याची परवानगी दिली आहे, पण यो-यो टेस्ट शेअर करण्यावर बंदी घातली आहे.
आशिया चषक आणि विश्वचषकापूर्वी फिटनेस टेस्ट शिबीर
खरं तर, आशिया चषक आणि विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेपूर्वी खेळाडूंचा फिटनेस तपासण्यासाठी बीसीसीआयने बंगळुरूत विशेष शिबिराचे आयोजन केले आहे. इथे खेलाडू आपला फिटनेस टेस्ट देतील. खरं तर, सप्टेंबर महिन्यात मुख्य निवडकर्ते अजित आगरकर विश्वचषकासाठी 15 सदस्यीय संघ घोषित करणार आहेत. अशात सर्व खेळाडूंच्या फिटनेसविषयी त्यांना खात्री हवी आहे. (bcci taken action on cricketer virat kohli posts yo-yo test score know here)
हेही वाचा-
World Cup 2023मध्ये ‘हा’ फलंदाज करणार सर्वाधिक धावा, दक्षिण आफ्रिकेच्या महान खेळाडूची भविष्यवाणी
धोनी आणि युवराजच्या निवृत्तीनंतर ‘या’ खेळाडूने घेतली त्यांची जागा, World Cupपूर्वी अश्विनचा मोठा दावा