---Advertisement---

भर सामन्यात फलंदाजाने हेल्मेटला मारली लाथ, लज्जास्पद कृती पाहून भडकले पंच अन् खेळाडू

On: शुक्रवार, नोव्हेंबर 26, 2021 12:15 AM
---Advertisement---

सध्या ऑस्ट्रेलियात शेफिल्ड शील्ड ही देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा सुरू आहेत. या स्पर्धेतील चार दिवसीय सामन्यात क्वीन्सलँड आणि दक्षिण ऑस्ट्रेलियाचे संघ आमनेसामने आले होते. सामन्यादरम्यान एक अशी घटना घडली, ज्याची क्रिकेटजगतात मोठी चर्चा झाली.

दक्षिण ऑस्ट्रेलियाच्या डावात एका फलंदाजाने आपले नियंत्रण गमावले आणि रागाच्या भरात त्याने हेल्मेटला फुटबॉलसारखी वेगाने लाथ मारली. यानंतर विरोधी संघाचे खेळाडू आणि पंच त्याच्यावर चांगलेच संतापले. त्यानंतर बराच गदारोळही झाला. या सगळ्या प्रकारचा व्हिडिओ ऑस्ट्रेलियन वेबसाइटनेच शेअर केला आहे.

या सामन्यात दक्षिण अमेरिकेच्या डावादरम्यान आठव्या षटकात ही घटना घडली. खेळपट्टीवर सलामीवीर हेन्री हंट आणि नॉन स्ट्राईकवर जॅक वेइडेराल्ड हे दोन्ही खेळाडू खेळत होते. फिरकीपटू मॅथ्यू कुहनेमनने शेवटचा चेंडू टाकला, ज्यावर एकही धाव काढता आली नाही. षटक संपल्यानंतर क्षेत्ररक्षणात बदल सुरू झाला. यादरम्यान एका क्षेत्ररक्षकाने मैदानात ठेवलेले हेल्मेट नॉन स्ट्राइक स्टंपजवळ आणून ठेवले.

षटक संपताच वेडरल्ड स्ट्राईकवर आला आणि सहकारी खेळाडूशी बोलून तो परतला. तेव्हा स्टंपजवळ हेल्मेट पाहून त्याला राग आला. त्याने जोरात हेल्मेटला लाथ मारली आणि हेल्मेट गिरक्या घेत दूर उडाले. यानंतर विरोधी संघाचा कर्णधार आणि खेळाडूंनी वेदरल्डशी संवाद साधला. पंचानीही त्याला समजावले, पण त्याचा राग आणि देहबोली तशीच राहिली.

जाहीर झालेल्या व्हिडिओमध्ये खेळाडूने हेल्मेट इथे का ठेवले, इतरत्र का ठेवले नाही, असे वेदरल्ड विचारत आहेत. या प्रकारावर क्रिकेट चाहत्यांनी प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. बऱ्याच चाहत्यांनी या प्रकारावर निषेध नोंदवला आहे. एका चाहत्याने लिहिले की, ‘अशा खेळाडूंवर बंदी घातली पाहिजे, जे क्रिकेट खेळाचा अपमान करतात.’ अजून एका खेळाडूने लिहिले की, ‘ऑस्ट्रेलियाचे खेळाडू मैदानावर आणि मैदानाबाहेर नेहमी बेशिस्त वागत असतात.’

महत्त्वाच्या बातम्या-

गंभीरला जीवे मारण्याची धमकी देणारा मेल काश्मीर नाही, तर पाकिस्तानमधून आला; तपासातून मोठा खुलासा

‘आऊट ऑफ फॉर्म’ विराटची सुरू आहे स्पेशल तयारी, नव्या प्रशिक्षकांसह नेट्समध्ये गाळतोय घाम

धुआं-धुआं था वो समा… धुक्याने भरलेल्या कानपूर स्टेडियमला पाहून जाफरला सुचली मस्ती, शेअर केले मीम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---