---Advertisement---

गंभीरला जीवे मारण्याची धमकी देणारा मेल काश्मीर नाही, तर पाकिस्तानमधून आला; तपासातून मोठा खुलासा

On: शुक्रवार, नोव्हेंबर 26, 2021 12:02 AM
---Advertisement---

भारतीय संघाचा माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीर सध्या राजकारणात सक्रीय आहे. गंभीर सध्या दिल्लीतून भारतीय जनता पक्षाचा खासदार आहे. गंंभीरला मंगळवारी (२३ नोव्हेंबर) एक धमकी देणारा मेल आला होता. मेलमध्ये गंभीरला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. पोलिसांच्या तपासानंतर गंभीरला जीवे मारण्याची धमकी देणारा हा मेल पाकिस्तानमधून आला असल्याचे समोर आले आहे. दिल्ली पोलीस अजूनही याबाबतील तपास करत आहे.

गंभीरच्या मते त्याला मिळालेली ही धमकी आयएसआयएस कश्मीरमधून आली आहे. मात्र, पोलिसांच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार त्याला ज्या इमेलवरून जीवे मारण्याची धमकी दिली गेली आहे, तो मेल पाकिस्तानमधून आला आहे. तत्पूर्वी गंभीरने असा आरोप केला होता की, त्याला आयएसआयएस कश्मीरकडून जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. पण तपासात हा मेल ज्या सिस्टममधून पाठवला गेला आहे, त्याचा आयपी एड्रेस पाकिस्तानमध्ये दाखवला गेला आहे.

असे सांगितले जात आहे की, दिल्ली पोलिसांनी गुललला यासंदर्भात माहिती मागितली होती. त्यानंतर गुगलने दिलेल्या माहितीनुसार हा मेल पाकिस्तामधून पाठवला गेला आहे. याचसोबत हा मेल पाठवणाऱ्या व्यक्तीची माहिती देखील समोर आली आहे. असे सांगितले जात आहे की गंभीरला मेल पाठवणाऱ्याचे नाव शाहिद हमीद, असे आहे.

हे प्रकरण फक्त गंभीरपुरते मर्यादित नही. त्याच्याव्यतिरिक्त अजून अनेकांना आतंकवादी संघटना आयएसआयएसच्या नावाने असे धमकी देणारे मेल मिळाले आहेत. दिल्ली पोलिसांकडून या संपूर्ण प्रकाराचा सखोल तपास सुरू केला गेला आहे. या संपूर्ण प्रकरणावर दिल्ली पोलिसांव्यतिरिक्त इतरही संघटना देखील लक्ष ठेवून आहेत आणि तपासात सहकार्य करत आहेत.

दरम्यान, गंभीरला मुंगळवारी रात्री पहिला धमकी देणारा मेल आला होता. या मेलमध्ये त्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर गंभीरने त्याच दिवशी रात्री पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली आणि तक्रार देखील दाखल केली होती. यानंतर गंभीरच्या घराभोवतीची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती. त्यानंतर दुसरा मेल लगेच बुधवारी आला. या मेलमध्ये लिहिले होते की, ‘काल तुला मारायचे होते, पण वाचला. कश्मीरपासून लांब राहा.’ बुधवारी आलेल्या या मेलसोबत त्याच्या घराच्या बाहेरचा एक व्हिडिओ देखील पाठवला गेला आहे.

या संपूर्ण प्रकरणानंतर गंभीरने असा आरोप केला होता की, हा मेल कश्मीरमधील आयएसआयएस सोबत जोडले गेलेल्या लोकांकडून आला आहे. पण दिल्ली पोलिसांच्या तपासात मिळालेल्या माहितीनुसार गंभीरचा हा आरोप चुकीचा ठरत आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

‘आऊट ऑफ फॉर्म’ विराटची सुरू आहे स्पेशल तयारी, नव्या प्रशिक्षकांसह नेट्समध्ये गाळतोय घाम

शुभमन पुन्हा अर्धशतकाला शतकात बदलण्यात फेल, १६ डावांनंतरही ‘या’ बेस्ट स्कोरवरच अडलीय गाडी

राहुल-सचिनच्या नावातून पडले नाव, मुंबईकर असूनही बनला न्यूझीलंडचा हुकुमी एक्का; वाचा रचिन रवींद्रबद्दल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---