कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे क्रिकेट क्षेत्र ठप्प पडले आहे. अशात जवळपास सर्व देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे घरात अडकलेले क्रिकेटपटू लॉकडाऊन संपेपर्यंत वेगवेगळ्या प्रकारे सराव करत आहेत. मात्र, ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज झे रिचर्डसनने लॉकडाऊनमध्ये मिळालेल्या वेळेचा फायदा घेत, आपल्या उजव्या खांद्याची सर्जरी केली आहे. Australian fast bowler Jhye Richardson underwent shoulder surgery.
रिचर्डसनने मागील महिन्यात (एप्रिल) त्याच्या खांद्याची सर्जरी करून घेतली आहे. २०१९ला पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यादरम्यान त्याच्या खांद्याचे हाड जागेवरून सरकले होते. यामुळे त्याला विश्वचषक आणि ऍशेस मालिकेसाठी जाता आले नव्हते. त्याच्या या दुखापतीमुळे त्याला ६ महिने क्रिकेटपासून दूर रहावे लागले होते.
तरी, रिचर्डसनने मार्च २०१९ला झालेल्या दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या वनडे सामन्यातून पुनरागमन केले होते. पण त्याच्या खांद्याला त्रास जाणवत होता.
सध्या कोविड-१९ या महामारीमुळे क्रिकेट सामने स्थगित किंवा रद्द करम्यात आले. म्हणून क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे वैद्यकिय अधिकारी ऍलेक्स कॉन्टोरिसने विचार केला की, रिचर्डसनला त्याच्या खांद्याच्या सर्जरीसाठी ही योग्य वेळ असेल.
ऍलेक्स यांनी न्यूज कोर्पशी बोलताना सांगितले की, “ही खूप मोठी सर्जरी असते. पण, त्याला आता संधी मिळाली आहे. कारण, आम्ही सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर किंवा डिसेंबरपर्यंत क्रिकेट न खेळण्याची शक्यता आहे. जेव्हा हाड आपल्या जागेवरून हालते, तेव्हा बाजूचे लिगामेंटही ढिल्ले होतात. त्यामुळे होणाऱ्या जखमा खूप त्रासदायक असतात. म्हणून, त्यांची सर्जरी करणे गरजेचे असते.”
रिचर्डसनने २०१७ला श्रीलंकेविरुद्धच्या टी२० सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने आतापर्यंत २९ आंतरराष्ट्रीय सामने खेळत एकूण ३९ विकेट्स घेतल्या आहेत.
तसेच २०१९ ला ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या भारताविरुद्धच्या वनडे मालिकेत त्याने भारताचा कर्णधार विराटला ३ वेळा बाद केले होते. त्याचबरोबर त्याचा भारताविरुद्धची कामगिरी चांगली राहली आहे. त्याने भारताविरुद्ध ६ वनडे सामने खेळले असून १४ विकेट्स घेतले आहेत. यातील ४ वेळा त्याने विराटला बाद केले आहे.
ट्रेंडिंग घडामोडी-
धोनीच्या काळात खेळलो असलो तरी मी अनलकी नाही – पार्थिव पटेल
रोहित-विराट नाही तर ‘या’ क्रिकेटपटूने मारले आहेत टी२०…
धोनीची ती रिऍक्शन पाहून भारताचा वेगवान गोलंदाज जाम घाबरला होता