आयसीसी टी२० विश्वचषकाची सुरुवात २००७मध्ये झाली होती. विशेष म्हणजे, भारताने पहिल्याच टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानला पराभूत करत विजेतेपदावर आपले नाव कोरले होते.
याच विश्वचषकात भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगने अफलातून कामगिरी केली होती. या विश्वचषकादरम्यान युवराजने इंग्लंडचा गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच्या (Stuart Broad) गोलंदाजीवर एका षटकात सलग ६ षटकार ठोकले होते. त्याचा हा विक्रम आजही अबाधित आहे.
याबरोबरच, युवराज हा टी२० विश्वचषकात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंच्या यादीत अव्वल क्रमांकावर आहे. युवराजने आतापर्यंत भारताकडून ६ टी२० विश्वचषक खेळले आहेत. यादरम्यान त्याने एकूण ३३ षटकार मारले आहेत.
२०१९मध्ये त्याने क्रिकेटच्या सर्व स्वरुपातून निवृत्ती घेतली आहे. तरी त्याचा हा विक्रम अजूनही कोणत्या भारतीय क्रिकेटपटूला मोडता आला नाही. Yuvraj Singh is the most six hitter indian player in icc t20 world cup.
त्याच्यानंतर टी२० विश्वचषकात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत भारताचा हिटमॅन रोहित शर्मा दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने एकूण २४ षटकार मारले आहेत. शिवाय, रोहित हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय फलंदाज आहे.
टी२० विश्वचषकात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत १९ षटकारांसह भारताचा कर्णधार विराट कोहली हा तिसऱ्या क्रमांकावर आहे.
तसेच, आपल्या नेतृत्वाखाली भारताला पहिले टी२० विश्वचषक जिंकून देणारा भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने एकूण १६ षटकार मारले आहेत. तर, भारताचा डावखुरा फलंदाज सुरेश रैना १२ षटकारांसह या यादीत ५व्या क्रमांकावर आहे.
ट्रेंडिंग घडामोडी-