---Advertisement---

ऑस्ट्रेलियाचा दिग्गजही बनला सूर्याचा फॅन; तोंडभरून कौतुक करत आयसीसीलाच म्हणाला, ‘तो क्रांती घेऊन येतोय’

On: शनिवार, जानेवारी 28, 2023 5:50 PM
Suryakumar-Yadav-POTM
---Advertisement---

भारतीय संघाचा विस्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव याने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी20त आपला दम पुन्हा एकदा दाखवून दिला. या सामन्यात तो अर्धशतक करण्यापासून चुकला, पण त्याने संघाच्या धावसंख्येत मोलाचे योगदान दिले. सूर्याची फलंदाजी पाहून जागतिक क्रिकेटमधील अनेक दिग्गज त्याच्यावर प्रभावित झाले आहेत. त्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग याचाही समावेश आहे. पाँटिंगने सूर्याला मार्गदर्शक म्हणत त्याचे कौतुक केले. तसेच, त्याने म्हटले की, तो नवीन खेळाडूंच्या पिढीला त्याची शैली अंगीकारण्यासोबतच टी20 क्रिकेटला आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘दुसऱ्या क्रमांकावर’ घेऊन जाऊ शकतो.

सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याला नुकतेच आयसीसीचा वर्षातील सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय टी20 पुरुष क्रिकेटपटू म्हणून निवडले गेले. तो टी20त एका कॅलेंडर वर्षात 1000हून अधिक धावा करणारा दुसरा फलंदाज आहे. त्याने 2022मध्ये दोन शतके आणि 9 अर्धशतके ठोकत 1164 धावा कुटल्या. त्यामुळे तो पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान याच्या मागे पडला. त्याने 2021मध्ये 1326 धावा कुटल्या होत्या.

पाँटिंगकडून कौतुक
रिकी पाँटिंग (Ricky Ponting) याने आयसीसीशी बोलताना म्हटले की, “मला वाटते की, कौशल्य आणि नाविण्याच्या हिशोबाने मी क्रिकेटमध्ये सूर्यकुमारपेक्षा चांगला खेळाडू पाहिलाच नाही. तो जे काही करेल, अनेक खेळाडू त्याच्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे संपूर्ण जगात टी20 क्रिकेट प्रकारात कौशल्याचा एक वेगळाच स्तर पाहायला मिळेल.”

https://twitter.com/ICC/status/1619266587449593856

पाँटिंग असेही म्हणाला की, “कुणीतरी यावर्षी (2022) आयपीएलदरम्यान म्हटले होते की, काही खेळाडू असे असतील, जे तसेच करण्याचा प्रयत्न करतील, जे सूर्यकुमार करत आहे. तसेच, हे पाहणे शानदार ठरेल.” पाँटिंगने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये सूर्यकुमारला नावीण्य आणणारा क्रिकेटपटूही म्हटले. तसेच, त्याच्या फलंदाजीची तुलना दक्षिण आफ्रिकेच्या मर्यादित षटकांच्या क्रिकेटचा तज्ज्ञ एबी डिविलियर्स आणि माजी ऑस्ट्रेलियन यष्टीरक्षक ऍडम गिलख्रिस्ट यांच्याशी केली.

तो म्हणाला की, “तो यावेळी कोणत्याही इतर खेळाडूंपेक्षा चांगली कामगिरी करत आहे. आम्ही अशा खेळाडूबाबत बोलत आहोत, जो 360 डिग्रीमध्ये धावा करू शकतो. तो यामध्ये पारंगत आहे. तो यष्टीमागे आणि फाईन लेगमध्येही धावा करत आहे, जे खूपच चांगले आहे.”

सूर्यकुमार यादव सध्या न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेत खेळत आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला 21 धावांनी पराभवाचा धक्का बसला. त्यामुळे न्यूझीलंडने मालिकेत 1-0ने आघाडी घेतली आहे. या सामन्यात सूर्याने 34 चेंडूत 2 षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने 47 धावा केल्या आहेत.

उभय संघातील दुसरा टी20 सामना रविवारी (दि. 29 जानेवारी) लखनऊ येथे खेळला जाणार आहे. या सामन्यात भारतीय संघ विजय मिळवत मालिकेत बरोबरी करण्याचा प्रयत्न करेल. (australian former captain ricky ponting praises suryakumar yadav team india batter t20 cricket revolution)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
साऊथ सुपरस्टारलाही आवरला नाही संजूसोबत सेल्फी घेण्याचा मोह, फोटो सर्वत्र व्हायरल
पराभवानंतर टीम इंडियात दुसऱ्या टी20त होणार बदल? वॉशिंग्टन सुंदरने स्पष्टच सांगितले

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---