---Advertisement---

नागपूर कसोटीच्या पहिल्या दिवशी जडेजाने केली चीटिंग? ‘त्या’ व्हिडिओने माजली खळबळ

On: गुरूवार, फेब्रुवारी 9, 2023 9:11 PM
---Advertisement---

गुरुवारी (दि. 9 फेब्रुवारी) नागपूर येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (INDvAUS) संघात पहिला कसोटी सामना सुरू झाला. यादरम्यान भारतीय संघाने पहिल्या दिवसावर वर्चस्व गाजवले. तब्बल सहा महिन्यानंतर पुनरागमन करत असलेल्या रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याने घातक गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ तंबूत पाठवला. मात्र, त्याच्या या कामगिरीवर आता ऑस्ट्रेलियन मीडियाने शंका उपस्थित केली आहे.

आशिया चषक स्पर्धेनंतर जडेजा प्रथमच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी मैदानावर उतरलेला. त्याने या सामन्यात आपल्या लौकिकाला साजेशी गोलंदाजी केली. मार्नस लॅब्युशेन व स्टीव्ह स्मिथ या प्रमुख फलंदाजांसह त्याने 22 षटकात 47 धावा देत 5 गडी बाद केले. त्याने आपल्या कारकिर्दीत अकराव्या वेळी 5 गडी बाद करण्याची कामगिरी केली. ‌‌परंतु, जडेजाने चीटिंग केल्याचा आरोप ऑस्ट्रेलियाच्या माजी क्रिकेटपटू तसेच मीडियाने केला.

 

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत असून, त्यामध्ये जडेजा गोलंदाजी करण्याआधी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याच्या जवळ जातो. तो सिराजच्या हातावर असलेला एक चिकट पदार्थ आपल्या बोटावर लावताना दिसत आहे. त्यानंतर जडेजा त्याच बोटाने चेंडू हाताळताना दिसतोय. या व्हिडिओवर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार टीम पेन याने देखील प्रतिक्रिया देत ते काय होते असे विचारले. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन याने आपण असे पण आधी पाहिले नसल्याचे म्हटले.

या घटनेबद्दल मिळत असलेल्या माहितीनुसार, जडेजा त्याच्या दुखणाऱ्या बोटावर मलम लावत असल्याचे सांगितण्यात येत आहे. मात्र, त्याने हे कृत्य करण्यापूर्वी पंचांना कळवले होते का? असा प्रश्न उपस्थित होतोय. भारतीय संघाकडून याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया मिळाली नाही.

(Australian media found a way to target Ravindra Jadeja alleging him of foul play based on a short video clip shared on social media in Nagpur Test)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
चित्त्याची चपळाई दाखवत भरतने करून दिली धोनीची आठवण; करिअरची पहिली स्टंपिंग होतेय जोरदार व्हायरल
पाकिस्तानी खेळाडूचा मोठा गौप्यस्फोट! म्हणाला, ‘मीच कोच आणि कॅप्टनला म्हणालेलो मला टीममधून ड्रॉप करा’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---