---Advertisement---

२२ वर्ष टेनिस खेळणाऱ्या फेडररने अखेर टेनिसलाच केले पराभूत

---Advertisement---

मेलबर्न। आज(28 जानेवारी) ऑस्ट्रेलियन ओपन 2020मध्ये स्विझर्लँडचा टेनिस स्टार रॉजर फेडरर विरुद्ध अमेरिकेच्या टेनिस सँडग्रेनमध्ये उपांत्य पूर्व फेरीचा रोमांचकारी सामना रंगला. पाच सेटपर्यंत गेलेल्या या सामन्यात तिसऱ्या मानांकित फेडररने 6-3, 2-6, 2-6, 7-6(8), 6-3 अशा फरकाने विजय मिळवला. तसेच 15 व्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.

3 तास 31 मिनिटे चाललेल्या या सामन्यात फेडररने तब्बल 7 मॅच पाँइंट्स वाचवले. फेडररने या सामन्यातील पहिला सेट सहज जिंकला होता. मात्र त्यानंतरच्या दोन्ही सेटमध्ये फेडरर संघर्ष करताना दिसला. त्याने तिसऱ्या सेटमध्ये मेडिकल टाईम आऊटही घेतला. पण त्याला दुसरा आणि तिसरा हे दोन्ही सेट गमवावे लागले.

त्यामुळे स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी फेडररला चौथा आणि पाचवा सेट जिंकणे गरजेचे होते. पण सँडग्रेनही फेडररला कडवी लढत दिली.  टायब्रेकमध्ये गेलेल्या चौथ्या सेटमध्ये सँडग्रेनला तब्बल 7 मॅच पाॅइंट्स मिळाले होते. मात्र हे 7 मॅच पाॅइंट फेडररने अनुभवाच्या जोरावर वाचवत अखेर टायब्रेकर 10-8 असा जिंकला आणि सेटही जिंकला.

त्यामुळे सामना निर्णायक पाचव्या सेटमध्ये गेला. पाचव्या सेटमध्ये फेडररने पूर्णपणे वर्चस्व ठेवताना हा सेट जिंकत सामनाही आपल्या नावावर केला आणि उपांत्य फेरीत प्रवेश केला.

या सामन्यानंतर 7 मॅच पाँईट्स वाचवल्याबद्दल फेडरर म्हणाला, ‘मी आज खरोखर भाग्यवान होतो.’

आता फेडररचा उपांत्य फेरीतील सामना सार्बियाच्या नोव्हाक जोकोविच विरुद्ध होणार आहे. जोकोविचने कॅनडाच्या मिलोस राओनिकला पराभूत करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

https://twitter.com/Maha_Sports/status/1222125563432718336

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---