Australian Open 2025: ऑस्ट्रेलियन ओपन 2025 सुरू असल्याने टेनिसचा उत्साह सध्या शिगेला पोहोचला आहे. या स्पर्धेत जॅनिक सिन्नर, अलेक्झांडर झ्वेरेव्ह, कार्लोस अल्काराझ, डॅनिल मेदवेदेव, नोवाक जोकोविच असे अनेक टेनिस स्टार खेळत आहेत. बुधवारी (15 जानेवारी) लाईव्ह सामन्यादरम्यान टेनिस कोर्ट हलवावे लागले. फेलिक्स ऑगर-अलियासिमे आणि अलेजांद्रो डेव्हिडोविच फोकिना यांच्यातील दुसऱ्या फेरीच्या सामन्यादरम्यान मेलबर्न पार्क येथे ही घटना घडली.
बुधवारी रात्री मेलबर्न पार्क येथे झालेल्या पहिल्या सेटमध्ये फेलिक्स ऑगर अलिआसिमे आणि अलेजांद्रो डेव्हिडोविच फोकिना यांच्यातील दुसऱ्या फेरीचा सामना कोर्ट 6 मध्ये खेळवला जात होता. पण जवळच्या मद्यधुंद चाहत्यांकडून सतत येणाऱ्या आवाजामुळे खेळाडूंना लक्ष केंद्रित करणे कठीण झाले. 42 मिनिटांच्या खेळानंतर, पंच आणि स्पर्धेच्या अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप केला आणि सामना कोर्ट 7 मध्ये हलवण्याचा निर्णय घेतला. खेळाडू कोर्ट 7 मध्ये पोहोचले. त्याठिकाणी सामना पुन्हा सुरू झाला. कोर्ट 6 ची गोंधळ निर्माण करण्याची प्रतिष्ठा काही नवीन नाही. कोर्टमध्ये एक बार आहे. ज्याने खेळाडूंमध्ये मतभेद निर्माण केले आहेत. गेल्या वर्षी फ्रेंच खेळाडू आर्थर रिंडरकनेचने प्रेक्षकांच्या उद्धट वर्तनावर टीका केली होती. त्याच्या सामन्यादरम्यान टोमणे मारल्यानंतर त्याने कोर्टला “नाईट क्लब” म्हटले होते.
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, अलेजांद्रो डेव्हिडोविच फोकिना यांनी पाच सेटच्या रोमांचक सामन्यात फेलिक्स ऑगर अलियासिमे यांचा 6-7 (7-9), 6-7 (5-7), 6-4, 6-1, 6-3 असा पराभव केला. पहिले दोन सेट टायब्रेकमध्ये गमावल्यानंतर त्याने जबरदस्त पुनरागमन केले.
हेही वाचा-
IPL 2025; केएल राहुल नाही तर हा खेळाडू होऊ शकतो दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार
खेळाडूंची मजा संपली, बीसीसीआयने उचलले मोठे पाऊल, लादले 10 कडक निर्बंध
KHO KHO WC; भारताने ग्रुप स्टेजच्या शेवटच्या सामन्यात भुटानला नमवलं, 71-34 ने दणदणीत विजय