---Advertisement---

हा अनुभव प्रत्येकाला मिळो! मुलींसोबत राष्ट्रगीत गातानाचा क्षण अभिमानास्पद, वॉर्नरने शेअर केला फोटो

On: सोमवार, डिसेंबर 26, 2022 11:20 PM
David Warner Singing Nationl Anthem with his Daughters
---Advertisement---

दक्षिण आफ्रिका संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या संघामध्ये कसोटी मालिका खेळवली जात आहे. या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंड येथे खेळवला जात आहे. हा सामना ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेविड वॉर्नर याच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. वॉर्नरच्या कसोटी कारकीर्दीतील हा 100वा कसोटी सामना आहे. बॉक्सिंग डे टेस्टच्या पहिल्या दिवशी राष्ट्रगीत गायनावेळी त्याला आपल्या तीन मुलींची साथ मिळाली. त्याची ही आठवण त्याने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केली.

https://www.instagram.com/p/Cmn1cWXLHVH/?utm_source=ig_web_copy_link

डेवीड वॉर्नर (David Warner) आपला 100वा कसोटी सामना मेलबर्न येथे खेळत आहे. सामना सुरु होणाच्या आधी राष्ट्रगीत गायन झाले. त्यावेळी वॉर्नरसोबत त्याच्या तीन मुलीदेखील उपस्थित होत्या. त्याने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन एक फोटो शेअर केला, ज्यात तो राष्ट्रगीतासाठी संघातील दुसऱ्या खेेळाडूंसोबत रांगेत उभा आहे. तेव्हा त्याच्या मुली देखील आपल्या वडीलांसमोर उभ्या होत्या. हा सुंदर फोटो शेअर करताना ऑस्ट्रेलियाच्या या फलंदाजाने कॅप्शनमध्ये लिहिले की, “माझ्या मुली जवळ असताना राष्ट्रगीत गाणं, हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे.” यावर जगभरातील चाहते आपली प्रतिक्रिया देत आहेत. यामध्ये सर्वाधिक प्रमाणात त्याच्या कामगिरीसाठी त्याच्यावर शुभेच्छांचा पाऊस पडतोय. 36वर्षीय या फलंदाजाने 1 डिसेंबर,2011ला न्यूझीलंड विरुद्ध आपला पहिला सामना ब्रिस्बेनमध्ये खेळत पदार्पण केले होते.

बॉक्सिंग डे टेस्टमध्ये यजमानांचे धमाकेदार प्रदर्शन
या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिंस (Pat Cummins) याने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि त्याच्या गोलंदाजांनी त्याचा हा निर्णय योग्य ठरवला. पहिल्यांदा फलंदाजी करताना पाहुणा दक्षिण आफ्रिका संघ 189 धावांवर गारद झाला. ऑस्ट्रेलिया संघासाठी कॅमरुन ग्रीन (Cameron Green) हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने याा सामन्यात 5 गडी बाद करत 5 विकेट हॉल पूर्ण केला. पहिल्या दिवसाअखेर यजमान संघाच्या 1 बाद 45 धावा झाल्या होत्या.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बॉक्सिंग डे कसोटीदरम्यान शेन वॉर्नच्या आठवणीत भावूक झाले चाहते, पाहा व्हिडिओ
पृथ्वी-अर्जुनचा संघसहकारी दुसऱ्या देशासाठी खेळतोय आंतरराष्ट्रीय क्रिकेट; कारकीर्दीसाठी भारताला केला रामराम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---