भारतात सध्या क्रिकेटमध्ये कारकीर्द करण्यासाठी अनेक क्रिकेटपटू उत्सुक आहेत. देशभरातील जवळपास 40 संघटनांमध्ये लाखो क्रिकेटपटू घडत असतात. यातील सर्वांनाच भारतीय संघासाठी खेळण्याची संधी मिळत नाही. त्यामुळे मागील काही वर्षांपासून भारतीय क्रिकेटपटू इतर देशात जाण्याची संख्या वाढली आहे. आता यामध्ये आणखी एका नावाची भर पडली असून, त्याची थेट केनिया संघात निवड झालीये. उत्तर प्रदेशच्या हाथरस येथे जन्म झालेला व मुंबईमध्ये बरेचसे क्रिकेट खेळलेला पुष्कर शर्मा आता केनियासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना दिसेल.
दक्षिण आफ्रिका क्रिकेट वर्तुळात सातत्यपूर्ण कामगिरी केल्यानंतर पुष्कर याची केनिया संघात निवड झाली. यापूर्वी पुष्कर रवांडा येथे झालेल्या 2022 आयसीसी पुरुष टी20 विश्वचषक सब रिजनल पात्रता फेरीत केनिया ए संघासाठी खेळताना दिसला होता.
डाव्या हाताचा फलंदाज असलेल्या पुष्करने हाथरस येथे क्रिकेटचे धडे घेण्यास सुरुवात केले. त्यानंतर त्याने पुढील कारकीर्दीसाठी मुंबईकडे प्रस्थान केले. 2014-2015 मध्ये पृथ्वी शॉच्या नेतृत्वातील मुंबईच्या अंडर-16 संघात त्याचा समावेश होता. तसेच अर्जुन तेंडुलकर व यशस्वी जयस्वाल यांच्यासोबत देखील त्याने बरेचसे क्रिकेट खेळले आहे. त्यानंतर त्याने केनियामध्ये खेळण्याचा निर्णय घेतला. यासाठी इंडिया फर्स्ट लाईफ या संस्थेची त्याला मदत झाली.
पुष्कर्याने मागील वर्षी एनपीसीए सुपर डिव्हिजन स्पर्धेत खेळताना 14 सामन्यात 841 धावा केल्या होत्या. त्यात झालेल्या आफ्रिका क्रिकेट प्रीमियर लीग स्पर्धेत विजेतेपद पटकावणाऱ्या नाकुरा लेपर्ड संघाचा तो भाग होता. या स्पर्धेतही त्याने 228 धावा केल्या. त्याने अंतिम सामन्यात 3 बळी मिळवत संघासाठी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
(India Born Pushkar Sharma Play For Kenya National Cricket Team)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ब्रॉडकास्टर स्टार स्पोर्ट्सच्या ‘या’ कृत्यावर संतापले चाहते, हार्दिकच्या व्हिडिओमुळे पेटला नवा वाद
डीन एल्गरला सांताकडून ‘गिफ्ट’! चेंडू स्टम्पला लागूनसुद्धा राहिला नाबाद, व्हिडिओ व्हायरल





