---Advertisement---

भारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियन संघाची घोषणा, बुमराहविरुद्ध प्रभावी खेळ करणाऱ्या सैम कॉन्स्टासला मिळाली संधी

On: गुरूवार, ऑगस्ट 7, 2025 4:53 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघ ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. भारताचा हा ऑस्ट्रेलिया दौरा आशिया कप 2025 नंतर, म्हणजेच 19 ऑक्टोबरपासून सुरू होईल आणि 8 नोव्हेंबरपर्यंत चालेल. या दौऱ्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 3 एकदिवसीय आणि 5 टी20 सामने खेळवले जाणार आहेत.

मात्र, त्याआधी ऑस्ट्रेलियाची ‘ए’ टीम भारतात येणार आहे. या दौऱ्यात ऑस्ट्रेलिया ए संघाला भारतात दोन चार-दिवसीय टेस्ट सामने आणि तीन एकदिवसीय सामने खेळायचे आहेत. यासाठीच क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या संघाची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलिया ए च्या टेस्ट संघात सॅम कॉन्स्टास याला संधी देण्यात आली आहे.

ऑस्ट्रेलिया ‘ए’ संघाचा भारत दौरा 16 सप्टेंबरपासून सुरू होऊन 5 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. या दौऱ्यात एकूण पाच सामने खेळवले जाणार असून त्यात 2 टेस्ट आणि 3 एकदिवसीय सामने असतील. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया ए यांच्यात हे सामने लखनऊ आणि कानपूर येथे होणार आहेत. ऑस्ट्रेलिया ए संघाच्या संपूर्ण दौऱ्याचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. ही मालिका दोन्ही देशांच्या वरिष्ठ संघांच्या मालिकेच्या आधीच संपणार आहे.

4-डे टेस्टसाठी ऑस्ट्रेलिया ‘ए’ संघ:
जेवियर बार्टलेट, कूपर कोनोली, जॅक एडवर्ड्स, आरोन हार्डी, कॅम्पबेल केलावे, सॅम कॉन्स्टास, नाथन मॅकस्वीनी, लान्स मॉरिस, टॉड मर्फी, फर्गस ओ’नील, ओलिव्हर पीक, जोश फिलिप, कोरी रोचिचिओली आणि लियाम स्कॉट.

वनडेसाठी ऑस्ट्रेलिया ‘ए’ संघ:
कूपर कोनोली, हॅरी डिक्सन, जॅक एडवर्ड्स, सॅम इलियट, जॅक फ्रेझर-मॅकगर्क, आरोन हार्डी, मॅकेन्झी हार्वे, टॉड मर्फी, तनवीर संघा, लियाम स्कॉट, लॅची शॉ, टॉम स्ट्रॅकर, विल सदरलँड आणि कॅलम विडलर.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---