भारतीय संघ आगामी घरच्या मैदानावर बांगलादेशविरुद्ध 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. त्यासाठी भारतीय संघाची घोषणा देखील झाली आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ कसोटी मालिका खेळणार आहे. तत्पूर्वी अनुभवी ऑस्ट्रेलियन फलंदाज स्टीव्ह स्मिथने विराट कोहलीचा (Virat Kohli) मैदानावरील दृष्टिकोन ऑस्ट्रेलियन खेळाडूचा विचार असल्याचे वर्णन केले आहे आणि त्याचा असा विश्वास आहे की कोहलीची विचार आणि कृती ऑस्ट्रेलियन आहे.
स्टार स्पोर्ट्सने एक्स वर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये स्मिथ म्हणाला, “विराट कोहली (Virat Kohli) विचार आणि कृतीत ऑस्ट्रेलियन आहे यावर माझा विश्वास आहे. तो ज्या पद्धतीने लढतीत उतरतो, ज्या पद्धतीने तो आव्हानाचा सामना करतो आणि विरोधी पक्षावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतो. मी म्हणेन की भारतीय खेळाडूंपैकी कदाचित त्याच्याकडे सर्वात जास्त ऑस्ट्रेलियन मानसिकता आहे.”
विराट कोहलीने (Virat Kohli) 29 कसोटी शतकांसह 80 आंतरराष्ट्रीय शतके झळकावली आहेत आणि 113 कसोटी सामन्यांमध्ये 49.16च्या सरासरीने 8,846 धावा केल्या आहेत, तर स्मिथने 109 कसोटी सामन्यांमध्ये 56.97 च्या सरासरीने 32 शतकांसह 9,685 धावा केल्या आहेत.
कोहलीचे भारतीय कसोटी संघात पुनरागमन झाले आहे. भारत बांगलादेशविरुद्ध 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. (19 सप्टेंबर) पासून कसोटी मालिकेचा थरार रंगणार आहे. बांगलादेशविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ- रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, रिषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह आणि यश दयाल
महत्त्वाच्या बातम्या-
राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन बनला संघमालक, खरेदी केला ‘या’ टीमचा हिस्सा
वनडेमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारे टाॅप-5 खेळाडू
आईच्या निधनाानंतर अवघ्या दोन दिवसांनी खेळायला आला धोनीचा हा धुरंधर..