जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यात विजय मिळवणे भारतासाठी कठीण बनत चालले आहे. बुधवारी (7 जून) भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ या सामन्यात आमने सामने आले. डब्ल्यूटीसीचा या सलग दुसऱ्या सामन्यात भारतीय संघ अंतिम सामन्यापर्यंत पोहोचला. पण यावेळीही त्याचे विजेतेपदाचे स्वप्न अपूर्ण राहण्याची शक्यता आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियन संघ भक्कम स्थितीत आहे. भारताने 5 बाद 151 धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलिया संघ अजून 318 धावांनी मागे आहे.
डब्ल्यूटीसी फायनलसारख्या महत्वाच्या सामन्यात सामन्यात ऑस्ट्रेलियन खेळाडू आपल्या संघासाठी पूर्ण योगदान देताना दिसले. दुसरीकडे भारतीय खेळाडू मात्र अपयशी ठरले. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने 121.3 षटकात 469 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय फलंदाज संयमी खेळ दाखवून मोठी धावसंख्या करतील, अशी सर्वांना अपेक्षा होती. मात्र, कर्णधार रोहित शर्मा () याच्या रूपात पहिली विकेट गमावल्यानंतर एकापाठोपाठ विकेट जात राहिल्या. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताच्या पाच प्रमुख फलंदाजांनी विकेट्स गमावल्या आणि संघाची धावसंख्या अवघी 151 धावा आहे.
दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातील ऑस्ट्रेलियन संघ फलंदाजी करत होत्या. पहिल्या दिवशी केलेल्या 3 बाद 327 धावांपासून पुढे स्टीव स्मिथ आणि ट्रेविस हेड यांनी खेळायला सुरुवात केली. दोघांनी पहिल्या डावात अनुक्रमे 121 आणि 163 धावांचे योगदान दिले. दिवसातील दुसरे सत्र संपण्याआधी ऑस्ट्रेलियन संघ 469 धावांवर सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात रोहित शर्मा आणि शुबमन गिल भारताकडून सलामीला आहे.
संघाची धावसंख्या 30 असताना रोहितच्या रूपात भारताला पहिला झटका बसला. त्यानंतर संघाची धावसंख्या 71 होईपर्यंत तीन महत्वाच्या विकेट्स भारताने गमावल्या. रोहितने 15, शुबमन गिलने 13, चेतेश्वर पुजाराने 14, तर विराट कोहलीने 14 धावांवर विकेट्स गमावल्या. अजिंक्य रहाणे आणि रविंद्र जडेजा यांच्यात अर्धशतकाची भागीदारी झाली. जडेजा वैयक्तिक अर्धशतक करणार असे वाटत असतानाच त्यानेही 48 धावांवर विकेट गमावली. दुसऱ्या दिवसाच्या शेवटचा अजिंक्य रहाणे आणि केएस भरत अनुक्रमे 29* आणि 5* धावांसह खेळपट्टीवर कायम आहेत.
ऑस्ट्रेलियन संघासाठी वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, स्कॉट बोलंड, कॅमरून ग्रीन यांनी आणि फिरकीपटू नाथन लियॉन याने प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. अध्यास्थितीला या सामन्यात विजय मिळवणे ऑस्ट्रेलियन संघासाठी सोपे वाटत आहे. दुसरीकडे भारतीय संघाच्या विजयाच्या आशा मावळताना दिसत आहेत. अजिंक्य रहाणेच्या साथीने राहिलेले फलंदाज संयमी खेळ दाखवू शकले, तर संघ सामना अनिर्णित करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Australian team in strong position on day two of WTC finals)
बातमी अपडेत होत आहे…
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रायुडू लवकरच करणार नव्या इनिंगची सुरुवात? घेतली आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची भेट
एका कॅप्टनने काढला दुसऱ्या कॅप्टनचा काटा, रोहितने स्वत:पेक्षा जास्त पंचांवर दाखवला विश्वास, पाहा Video