---Advertisement---

तब्बल २४ वर्षांनी पाकिस्तान दौऱ्यावर गेलेल्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी मारला ‘या’ पदार्थावर ताव

On: शनिवार, मार्च 12, 2022 7:17 PM
Dal-Roti
---Advertisement---

पाकिस्तानात क्रिकेट पुन्हा एकदा जोर धरू लागले आहे. सध्या पाकिस्तान संघ मायदेशात ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. कसोटी मालिकेनंतर उभय संघात एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे. कसोटी मालिकेतील पहिला सामना रावळपिंडीमध्ये खेळला गेला, जो अनिर्णीत राहिला. त्यानंतर आता दुसरा सामना कराचीमध्ये खेळला जात आहे. यादरम्यान, ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू मार्नस लॅब्युशेन (Marnus Labuschagne) याने त्यांना मिळालेल्या दुपारच्या जेवणाचा फोटो शेअर केला आहे, जो व्हायरल होत आहे.

ऑस्ट्रेलिया संघ मोठ्या काळानंतर पाकिस्तान दौऱ्यावर आला आहे आणि याच पार्श्वभूमीवर खेळाडूंच्या पाहुणचारात कसलीही कमी राहू नये, याची काळजी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड घेत असावे. ऑस्ट्रेलियन खेळाडू पीसीबीच्या पाहुणचाराचा आनंद घेत असल्याचे दिसत आहे. लॅब्युशेनने शेअर केलल्या दुपारच्या जेवणाच्या फोटोमध्ये डाळ आणि रोटी दिसत आहे. फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले की, लंचमध्ये डाळ आणि रोटी. स्वादिष्ट.

ऍलेक्स कॅरी पडली स्विमिंग पूलमध्ये
एक दिवसापूर्वी ऑस्ट्रेलियन सलामीवीर डेविड वॉर्नरने एक खास व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये त्यांचा यष्टीरक्षक फलंदाज ऍलेक्स कॅरे स्विमिंग पूलमध्ये पडतो. संघातील सर्व खेळाडू हॉटेलमधून सरावासाठी निघालेले असतात. ऍलेक्स कॅरी संघातील इतर खेळाडूंसोबत चर्चा करत चाललेला असतात त्याचा पाय घसरतो आणि तो स्विमिंग पूलमध्ये पडतो. चाहत्यांना हा व्हिडिओ खूपच आवडला आहे आणि ते यावर व्यक्त होत आहे.

https://www.instagram.com/p/Ca61u88rc4q/?utm_source=ig_web_copy_link

शाहीन अफ्रिदीने केली रवींद्र जडेजाची नक्कल
त्याव्यतिरिक्त पाकिस्तान-ऑस्ट्रेलिया यांच्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पाकिस्तानच्या सराव सत्रातील एक व्हिडिओही चर्चेचा विषय बनत आहे. पाकिस्तान संघाचे वेगवान गोलंदाज शाहीन अफ्रिदी, भारतीय अष्टपैलू रवींद्र जडेजाच्या गोलंदाजी ऍक्शनची नक्कल करताना दिसत आहे. या व्हिडिओचीही चाहत्यांमध्ये खूप चर्चा होत आहे.

दरम्यान, मागच्या २४ वर्षांमध्ये ऑस्ट्रेलिया संघ पहिल्यांदाज पाकिस्तान दौऱ्यावर आला आहे. पाकिस्तानमध्ये ऑस्ट्रेलियाला तीन कसोटी आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळायची आहे. तसेच एकमात्र टी-२० सामनाही खेळवला जाईल. कसोटी मालिकेतील पहिला सामना अनिर्णीत राहिला असून, दुसरा सामना १२ मार्चपासून खेळला जात आहे.

महत्वाच्या बातम्या –

Video: मुंबई इंडियन्सची नवी ‘आपली जर्सी’ पाहिली का? लई भारी दिसतेय

भारत-श्रीलंका दुसऱ्या कसोटीत कसे असेल वातावरण खेळपट्टी आणि संभावित प्लेइंग ११, जाणून घ्या सर्वकाही

भारत-श्रीलंका दुसऱ्या कसोटीत कसे असेल वातावरण खेळपट्टी आणि संभावित प्लेइंग ११, जाणून घ्या सर्वकाही

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---