ऑस्ट्रेलियाचे सायमन फ्राय आणि व्हिक्टोरियाचे जॉन वॉर्ड यांनी एलिट पंच पॅनलमधून निवृत्ती घेतली आहे. फ्रायने आतापर्यंत १०० प्रथम श्रेणी सामने, १३० अ दर्जाचे सामने, ९३ टी२० सामने, ७ कसोटी सामने आणि ४९ वनडे सामन्यांमध्ये पंचाची जबाबदारी पार पाडली आहे.
मार्चमध्ये शेफील्ड शिल्डमध्ये ब्लंडस्टोनच्या मैदानावर टास्मानिया आणि न्यू दक्षिण वेल्स या संघात सामना झाला होता. पंच (Umpire) म्हणून काम करण्याचा हा त्यांच्या कारकीर्दीतील शेवटचा सामना होता.
निवृत्तीची घोषणा करताना फ्राय (Simon Fry) म्हणाले की, “मला असे वाटते की, निवृत्ती (Retirement) घेण्याची ही योग्य वेळ आहे. तसेच इतरांना समान संंधी आणि आव्हाने द्यायला पाहिजे, ज्यांचा मी आनंद घेतला आहे.”
“मला असे वाटते की, मी अनेक चांगले मित्र बनवले आहेत, ज्यांचा मी कायमच आदर करेल. मला माझ्या संपूर्ण कारकीर्दीत दिलेल्या पाठिंब्यासाठी एसएसीए, सीए आणि आयसीसी या बोर्डांना धन्यवाद द्यायचे आहे,” असेही फ्राय पुढे म्हणाले.
फ्राय हे आपल्या २० वर्षांच्या कारकीर्दीत एकूण ४ वेळा क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या पुरस्काराने सन्मानित झाले आहेत.
याव्यतिरिक्त फ्राय यांच्या तुलनेत व्हिक्टोरियाचे जॉन (John Ward) यांना पंच म्हणून काम करण्याचा अनुभव कमी आहे. जॉन यांनी ८७ प्रथम श्रेणी, ८४ अ दर्जाचे सामने, ११७ टी२० सामने आणि ७ वनडे सामन्यात पंचाची भूमिका निभावली आहे.
निवृत्तीची घोषणा करताना जॉन म्हणाले की, “या स्तरावर इतके वर्ष पंच म्हणून काम पाहिल्यामुळे मी स्वत:ला खूप भाग्यवान समजतो. हे माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. मी मैदानावर उपस्थित असणारे कर्मचारी, सामना अधिकारी, सीए कर्मचारी आणि खेळाडू यांच्याबरोबर माझे जे नाते तयार झाले आहे. ते माझ्यासाठी मुख्य आकर्षण आहे.
त्याचबरोबर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (Cricket Australia) म्हटले की, “आपल्या संपूर्ण कारकीर्दीत जॉन आणि फ्राय यांनी विलक्षण कौशल्याने काम केले आहे. त्यांची गणना सर्वश्रेष्ठ पंचांच्या श्रेणीत केली जाईल.”
ट्रेंडिंग घडामोडी-
-गंभीर म्हणतो, फक्त हा खेळाडू संघात हवा होता, केकेआरने जिंकली असती अनेक विजेतेपदं
-धोनी नसेल तर चेन्नई सुपर किंग्जचं काही खरं नाही
-रात्री दोन वाजता त्या क्रिकेटपटूने सांगितलं, मला आहेत कोरोनाची लक्षणं