ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाची वेगवान गोलंदाज मेगन शुट आणि तिची महिला जोडीदार जेस होलीओके यांच्या घरी लवकरच नवा छोटा पाहुणा येणार आहे. हे लेस्बियन जोडपे यावर्षी नोव्हेंबरमध्ये पालक होतील. अलीकडेच मेगन आणि तिची मैत्रीण जेस ट्रेकिंगसाठी गेले होते. जिथे दोघींनी प्रेग्नेंसी फोटोशूट केले. त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. चाहत्यांसह खेळाडू देखील जोडप्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
मेगनने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत. या दोघींमधील प्रेम पाहण्यासारखे आहे. पहिल्या फोटोत दोघेही एकमेकींना किस करत असताना दिसत आहेत आणि दोघींनी हातात ‘बेबी शूट’ लिहिलेली जर्सी धरली आहे. या फोटोमध्ये शूटने ऑलिव्ह ग्रीन स्वेटर घातला आहे. तर तिची महिला पार्टनर जेसने घट्ट (फिट्ट) ड्रेस घातला आहे. यानंतर मेगनचा आणखी एक खास फोटो आहे, ज्यात ती एका घनदाट जंगलात उभी राहून तिच्या बेबी बंपकडे पाहताना दिसत आहे.
https://www.instagram.com/p/CSUEioFpaxX/?utm_source=ig_web_button_share_sheet
मेगनने यावर्षी मार्चमध्ये ट्विटरवर एक फोटो पोस्ट करून चाहत्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर केली होती. मग तिने लिहिले की, ‘जेस आणि मी हे रहस्य उघड करण्यासाठी खूप उत्साहित आहोत. जेस आनंदी आहे की, ती ‘बेबी शूट’ला कॅरी करत आहे, ती खूप भाग्यवान आहे.’
https://www.instagram.com/p/CQYJx6iNm9C/?utm_source=ig_web_button_share_sheet
ऑस्ट्रेलियाची वेगवान गोलंदाज मेगन आणि जेस यांची ब्रिस्बेन येथील राष्ट्रीय क्रिकेट केंद्रात भेट झाली होती. या लेस्बियन जोडप्याने 2019 मध्ये लग्न केले होते. दोघीही ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाचा भाग आहेत. मेगन वेगवान गोलंदाज आहे, तर जेस क्रिकेट ऑस्ट्रेलियासाठी सुविधा व्यवस्थापक म्हणून काम करते.
मेगन आणि जेसने लग्नानंतर लवकरच मूल होण्याचा विचार केला. दरम्यान, समलिंगी असल्याने त्याच्याकडे मर्यादित पर्याय होते. त्यामुळे दोघींनी परस्पर आयव्हीएफद्वारे पालक होण्याचा निर्णय घेतला. या तंत्रात एक भागीदार अंड्याचे दान करतो आणि दुसऱ्याला गर्भ प्राप्त होतो. अनेक चाहत्यांनी लेस्बियन जोडप्याच्या गर्भधारणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यामुळे ही ऑस्ट्रेलियन खेळाडू खूप चिडली होती.
याक्षणी मेगनची गणना महिला क्रिकेटमधील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांमध्ये केली जाते. सर्व प्रकारच्या खेळपट्ट्यांवर चेंडू कसा स्विंग करायचा हे तिला माहीत आहे. न्यूझीलंड दौऱ्यावर ती शेवटची संघासोबत दिसली होती. त्या दौऱ्यात ऑस्ट्रेलियाने तीन एकदिवसीय आणि इतकेच टी-20 सामने खेळले होते. या दौऱ्यात वेगवान गोलंदाज मेगनने टी-20 मालिकेत 3 आणि वनडे मालिकेत 7 विकेट घेतल्या. पहिल्या एकदिवसीय सामन्यात तिला सामनावीर म्हणूनही गौरवण्यात आले होते.
मेगन ऑस्ट्रेलियासाठी आतापर्यंत 4 कसोटी, 65 एकदिवसीय आणि 73 टी-20 खेळली आहे. यामध्ये तिने एकूण 204 विकेट्स घेतल्या आहेत. ती बिग बॅश लीगमध्ये ॲडलेड स्ट्रायकर्स संघाकडून खेळते.
महत्त्वाच्या बातम्या-
परदेशी लीगमध्ये भारतीय महिला अष्टपैलूचा कहर; २ विकेट्स चटकावल्यानंतर पाडला धावांचा पाऊस
चेन्नई पाठोपाठ मुंबईही ‘या’ दिवशी युएईला होणार रवाना, पहिल्याच सामन्यात असतील आमने सामने
“लॉर्ड्स कसोटी जिंकल्यास भारत टेस्ट सीरिजमध्ये इंग्लंडला व्हाईटवॉश करेल”