भारतीय महिला क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघात सध्या टी-२० मालिका खेळली जात आहे. मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करावा लागला होता. दुसऱ्या टी-२० सामना शनिवारी (९ ऑक्टोबर) पार पडला आणि या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने भारतावर चार विकेट्सने विजय मिळवला आहे.
भारताने सामन्यात प्रथम फलंदाजी केली. सुरुवातील संघ १०० धावा करू शकेल याबाबतही शंका होती, पण पूजा वस्त्राकरने १९ चेंडूत ३७ धावांची खेळी केली आणि संघाला संन्मानजनक धावसंखेपर्यंत घेऊन गेली. भारतीय संघाने ९ विकेट्सच्या नुकसानावर ११८ धावा केल्या होत्या.
भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्टेलियाने हे लक्ष्य १९.१ षटकात गाठले. ऑस्ट्रेलियाच्या तहलिया मॅकग्राने ३३ चेंडूत नाबाद ४२ धावांची खेळी केली आणि संघाच्या विजयामध्ये महत्वाची भूमिका पार पाडली. मॅकग्राने १८ व्या षटकात शिखा पांडेच्या गोलंदाजीवर १४ धावा केल्या आणि सामना ऑस्ट्रेलियाच्या बाजून झुकवला. त्यानंतर रेणुका सिंगही भारतीय संघासाठी महागात पडली आहे. १९ वे षटक टाकण्यासाठी आलेल्या रेणुकाने १३ धावा दिल्या आणि ऑस्ट्रेलियाने सामन्यात सहज विजय मिळवला.
भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर सामना संपल्यावर म्हणाली की, आमची धावसंख्या या खेळपट्टीवर २० धावांनी कमी पडली. शिखा पांडेने (४ षटकांमध्ये २७ धावा आणि १ विकेट) एलिस हिलीला त्रिफळाचीत करत ऑस्ट्रेलियाला पहिला झटका दिला. त्यानंतर राजेश्वरी गायकवाडने (४ षटकांमध्ये २१ धावा आणि ३ विकेट्स) मेग लॅनिंगला (१५) बाद केले. एलिस गार्डनर (०१) हरमनप्रीतच्या चेंडूवर गायकवाडच्या हातात झेलबाद झाली. दीप्ति शर्माने पुन्हा खतरनाक दिसणारी एलिस पेरीची (०१) विकेट घेतली, जी कव्हरमध्ये हरमप्रीतच्या हातात झेल देऊन पव्हेलियनमध्ये पोहोचली.
अशाप्रकारे ऑस्ट्रेलिया संघाची धावसंख्या चार विकेट्सवर ४६ धावा अशी होती. बेथ मूनी (३६ चेंडूत ३४) तिच्या डावात सतर्क दिसली आणि मॅकग्राने पुन्हा गोलंदाजांची धुलाईला सुरुवात केली. भारतीय संघाचे क्षेत्ररक्षणही खराब दिसले. गायकवाडने मूनीनंतर निकोला कॅरीलाही बाद केले. अशाप्रकारे भारतीय संघाने ९४ धावांपर्यंत सहा विकेट्स घेतले होते आणि त्यांना सामन्यात वापसी करण्याची अपेक्षा होती. मात्र, पांडे आणि रेणुका चांगली गोलंदाजी करू शकल्या नाहीत आणि मॅकग्राने ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला.
महत्त्वाच्या बातम्या-
-रवी शास्त्रींनंतर भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक कोण? ‘या’ नव्या परदेशी दिग्गजाचे नाव चर्चेत
-इशान-सूर्यकुमारच्या फटकेबाजीपुढे पियुष चावलाचा ‘मोठा’ विक्रम राहिला दुर्लक्षित!