भारताकडून अनेक खेळाडूंनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध चांगली कामगिरी केली आहे. यात सचिन तेंडुलकर, व्हीव्हीएस लक्ष्मण, हरभजन सिंगचा समावेश आहे. त्यातही गोलंदाज म्हणून हरभजन सिंगची कामगिरी ऑस्ट्रेलियाविरुद्ध शानदार राहिली आहे.
ऑस्ट्रेलियन खेळाडू हरभजनपासून लांब रहा असे म्हणायचे, असा खूलासाही नुकताच सुरेश रैनाने इरफान पठाणबरोबर इंस्टाग्राम लाईव्ह व्हिडिओ चॅटवर बोलताना केला आहे.
रैना आणि इरफानने निवड समीतीने अनुभवी खेळाडूंना संघातून वगळण्याआधी त्यांच्याशी संवाद साधायला हवा होता, अशीही चर्चा केली. यावेळी हरभजनचेही त्यांनी नाव घेतले. इरफान म्हणाला, ‘हरभजन एक दिग्गज आहे. त्याच्याइतका चांगला ऑफस्पिनर जगात नाही. त्याच्याबरोबरच चांगला संवाद साधता आला असता. तो दिग्गज होता आणि त्याने १०० पेक्षाही अधिक कसोटी सामने खेळेले.’
पुढे रैना म्हणाला, ‘हरभजन लढावूवृत्तीचा आहे. त्याने आपल्याला ऑस्ट्रेलियामध्ये सामने जिंकून दिले आहेत. ऑस्ट्रेलियन नेहमी हरभजन सिंगपासून दूर रहा असे म्हणायचे.’
त्यावर इरफान म्हणाला, ‘हरभजनचे नाव ऐकताच ते आपल्या कानावर हात ठेवायचे.’
२०१६ ला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळलेल्या हरभजनने त्याच्या कारकिर्दीत १८ कसोटी सामने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळले आहेत. यात त्याने ९५ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच त्याने कसोटीमध्ये हॅट्रिकही ऑस्ट्रेलियाविरुद्धच घेतली होती.
हरभजन आणि ऑस्ट्रेलियाच्या अँड्र्यू सायमंड्समध्ये २००८ ला झालेल्या वादाबद्दलही इरफानने भाष्य केले आहे. तो म्हणाला, ‘हरभजन मला सांगायचा की ‘मी हरभजन सिंग नाही, मी मायकल जॅक्सन असल्यासारखे वाटत आहे. २००८च्या मालिकेत मीडिया मला सगळीकडे फॉलो करायची. मैदानापासून हॉटेल, मॉलपर्यंत. मॉलच्या शौचालयापर्यंतही त्याला सोडले नव्हते.’
याआधी काही दिवसांपूर्वी हरभजननेही रोहित शर्माबरोबर इंस्टाग्राम लाईव्ह व्हिडिओ चॅटवर बोलताना रिकी पाँटिंगला बाद करण्याबद्दलच्या आठवणींबद्दल सांगितले होते. तो म्हणाला होता की रिकी पाँटिंगला त्याच्यासमोर बाद होण्याची सवय लागली होती.
हरभजन म्हणाला, ‘मला वाटते पाँटिंगला माझ्या चेहऱ्याला पाहून बाद होण्याची सवय झाली होती. मला त्याला गोलंदाजी करण्याचीही गरज नाही. जेव्हा तो मुंबई इंडियन्समध्ये आला तेव्हा मी विचार केला माझ्या गोलंदाजीचा नेट्समध्ये सराव केल्याने त्याच्यात सुधारणा होईल. पण तेथेही मी त्याला ५-६ वेळा बाद केले.’
ट्रेंडिंग घडामोडी –
मुंबई इंडियन्सचा खेळाडू म्हणतो, जेव्हा सचिनला पहिल्यांदा पाहिल तेव्हा..
बेटा बेटा होता हैं, बाप बाप होता हैं! असं बोलल्याचा सेहवागचा हा दावा आहे खोटा, कारण…
या दोन खेळाडूंना वाटतं, बीसीसीआयने परदेशातील लीग खेळू द्याव्यात