ऑस्ट्रेलियन संघ विश्वचषक 2023 स्पर्धेत मागच्या काही सामन्यांमध्ये अप्रतिम खेळला आहे. आपला पुढचा सामना ऑस्ट्रेलियाला इंग्लंडविरुद्ध खेळायचा आहे. शनिवारी (4 नोव्हेंबर) अंहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे. उपांत्य फेरीत जागा पक्की करण्यासाठी या सामन्यातील विजय ऑस्ट्रेलियासाठी महत्वाचा असेल. पण त्याआधी बुधवारी (1 नोव्हेंबर) ऑस्ट्रेलियन संघाची चिंता वाढवणारी एक बातमी समोर येत आहे.
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील हा सामना रोमांचक होण्याची पूर्ण शक्यता आहे. पण नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात शतकी खेळी करणाऱ्या ग्लेन मॅक्सवेल () याला पुढच्या सामन्यात खेळता येणार नाही. माध्यमांतील वृत्तांनुसार मॅक्सवेल सोमवारी गोल्फ कार्टमधून जात असताना त्याचा अपघात झाला. क्लपहाऊसमधून संघाच्या बसकडे जात असताना त्याच्यासोबत हा प्रकार घडल्याचे सांगितले गेले. माहितीनुसार मॅक्सवेल साधारन 300 मीटर अंतर पार करायचे होते आणि प्रत्येकासाठी गोल्फा कार्ट उपलब्ध नसल्यामुळे मॅक्सवेल मागच्या बाजूला धरून उभा होता. पण यादरम्यानच त्याचा पाय निसटला आणि खाली पडल्यामुळे त्याला दुखापत झाला. आता पुढचे सहा ते आठ दिवस त्याला विश्रांतीवर राहावे लागू शकते. ऑस्ट्रेलियाचे मुख्य प्रशिक्षक एँड्र्यू मॅक्डोनल्ड यांनी मॅक्सवेलच्या दुखापतीविषयी माहिती दिली.
दरम्यान, ऑस्ट्रेलियासाठी विश्वचषक स्पर्धेची सुरुवात अपेक्षित पद्धतीने होऊ शकली नाही. स्पर्धेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्याकडून ऑस्ट्रेलियन संघ पराभूत झाला. पण त्यानंतर पुढचे सलग चार सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले. यात श्रीलंका, पाकिस्तान, नेदरलँड्स आणि न्यूझीलंड या संघांना ऑस्ट्रेलियाने पराभवाची धूळ चारली. सहा पैकी चार विजयांसह ऑस्ट्रेलियन संघ सध्या चौथ्या क्रमांकावर आहे. अशात उपांत्य फेरीत आपले स्थान पक्के करण्यासाठी पुढचा प्रत्येक सामना जिंकण्याचा प्रयत्न ऑस्ट्रेलियाकडून केला जाईल. दुसरीकडे इंग्लंड संघ गुणतालिकेत शेवटच्या क्रमांकावर आहे. इंग्लंडने हंगामात आतापर्यंत खेळलेल्या 6 पैकी फक्त एक सामना जिंकला आहे. (Australia’s Glenn Maxwell will miss the match against England due to injury)
महत्वाच्या बातम्या –
ओळख लपवून मुंबईच्या रस्त्यावर उतरताच सूर्याने केलं ‘हे’ काम, चाहता म्हणाला, ‘बॅटिंगच येत नाही…’
पुण्यात न्यूझीलंड संघ ‘टॉस का बॉस’, दिग्गजाला घेतले ताफ्यात; दक्षिण आफ्रिकेनेही केला ‘वेगवान’ बदल