भारतात क्रिकेटला धर्म मानले जाते. आयपीएल, असो द्विपक्षीय मालिका असो किंवा आयसीसी स्पर्धा असो, प्रेक्षक मोठ्या संख्येने सामन्यांना हजेरी लावतात. सध्या भारतात वनडे विश्वचषक 2023 स्पर्धा सुरू आहे. स्पर्धेने अर्धा टप्पा ओलांडला आहे. स्पर्धेतील 31 सामने झाले आहेत. भारतीय संघाने आतापर्यंत खेळलेल्या सहाच्या सहा सामन्यात विजय मिळवला आहे. भारत उपांत्य फेरीत पोहोचण्याचा आणि किताब जिंकण्याचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. अशात सूर्यकुमार यादव आपली ओळख लपवून लोकांमध्ये पोहोचला आणि त्याने संघाविषयी चर्चा केली. यादरम्यान त्याने स्वत:शी संबंधित प्रश्न विचारले, ज्यावर लोकांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थातच, बीसीसीआयने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओत सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) मास्क आणि चष्मा लावून आपल्या खोलीतून बाहेर निघतो. यावेली रवींद्र जडेजासुद्धा त्याला ओळखू शकत नाही. यानंतर सूर्या त्याला सांगतो की, तो मरीन ड्राईव्हला जात आहे. जडेजा म्हणतो की, “त्याला कोणीही ओळखू शकणार नाही.” आधी सूर्या लोकांमध्ये जातो आणि क्रिकेटविषयी चर्चा करतो. लोकांच्या उत्तराने त्याला समजते की, सर्वांना भारतीय संघाने किताब जिंकण्याची अपेक्षा आहे.
यानंतर तो क्रिकेटप्रेमींना शोधण्याचा प्रयत्न करतो. यावेळी त्याला एक चाहतेा मिळतो. तो त्या चाहत्याला भारतीय फलंदाजांविषयी प्रश्न विचारतो. यावर चाहता म्हणतो की, भारताच्या सुरुवातीच्या तीन फलंदाजांनाच खेळता येते. यानंतर सूर्या विचारतो की, सूर्यकुमार यादव कसा खेळाडू आहे? यावर चाहता राग व्यक्त करत म्हणतो की, “त्याला खेळता येत नाही. प्रशिक्षकांच्या मदतीने त्याने फलंदाजी शिकली पाहिजे.”
यानंतर सूर्यकुमार म्हणतो की, त्याला खूपच हसू येत होते. मात्र, तो कसाबसा स्वत:ला शांत ठेवण्यात यशस्वी ठरला. व्हिडिओत पुढे सूर्याला त्याची चाहती मिळते. ही चाहती त्याचे जोरदार कौतुक करते. त्याला ‘मिस्टर 360’ (Mr 360) डिग्री खेळाडू म्हणते. यानंतर तो खूपच खुश होतो. सूर्या यावेळी चष्मा आणि मास्क काढून चाहतीसोबत फोटोही काढतो आणि पुन्हा हॉटेलमध्ये जाण्यासाठी निघतो.
सूर्याचा स्पर्धेतील कामगिरी
सूर्यकुमार यादव याला आतापर्यंत विश्वचषक 2023 स्पर्धेत दोन सामन्यात फलंदाजीची संधी मिळाली आहे. मात्र, त्याला यावेळी खास प्रदर्शन करता आले नाही. तो पहिल्या सामन्यात लवकर तंबूत परतला होता. त्याला न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात 2 धावांवर धावबाद होऊन तंबूत परतावे लागले होते. त्यानंतर त्याने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात 49 धावांची खेळी केली. अशाप्रकारे त्याने 2 सामन्यात 51 धावा केल्या आहेत. अशात भारताचा पुढील सामना गुरुवारी (दि. 02 नोव्हेंबर) मुंबईच्या वानखेडे स्टेडिअममध्ये खेळला जाणार आहे. या सामन्यात सूर्याला संधी मिळाली, तर तो कशी कामगिरी करतो? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (mr 360 suryakumar yadav talks with fans after hiding identity jadeja not recognised him watch funny video 2023)
हेही वाचा-
वर्ल्डकप चालू असताना धक्कादायक बातमी! इंग्लंडच्या स्टार खेळाडूने केली Retirementची घोषणा
बॉलिवूडच्या अण्णाने जावयालाच दिला धोका! KL Rahul नाही, तर ‘या’ खेळाडूला म्हटले ‘आवडता’ क्रिकेटर