सध्या ऑस्ट्रेलिया संघ आजपासून (11 सप्टेंबर) इंग्लंड दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये 3 सामन्यांची टी20 मालिका खेळली जाणार आहे. तत्पूर्वी एक बातमी समोर आली आहे की, ऑस्ट्रेलियातील एका ग्रेड क्रिकेट सामन्यादरम्यान पंचांच्या निर्णयाशी असहमत राहिल्याने ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज मार्नस लाबुशेनला (Marnus Labuschagne) निलंबित केले जाऊ शकते.
वास्तविक, ही घटना केएफसी टी20 मॅक्स स्पर्धेत रेडलँड्स आणि व्हॅलीज यांच्यात खेळल्या गेलेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यादरम्यान घडली. रेडलँड्सचा कर्णधार मार्नस लाबुशेन व्हॅलीजच्या फलंदाजीदरम्यान पंचांनी एका वादग्रस्त झेलला बंप कॅच म्हणून घोषित कैल्यावर नाराज दिसला. यानंतर तो पंचांशी वाद घालताना दिसला. पण रिप्लेमध्ये असे दिसून आले की लाबुशेनचे बरोबर होते आणि व्हॅलीचा फलंदाज विब्जेनला बाद घोषित करायला हवे होते.
षटकाच्या दरम्यान, लाबुशेन पंचांना काहीतरी बोलताना दिसला. त्याचवेळी पंच त्याला दूर जाण्यास सांगत होते. षटक संपल्यानंतर दोन्ही पंच मैदानावर बसले. मात्र, आता लाबुशेनला त्याच्या कृत्याचे परिणाम भोगावे लागू शकतात. त्याच्यावर लेव्हल 2च्या गुन्ह्याचा आरोप आहे. त्याला या आठवड्यात न्यायाधिकरणाच्या सुनावणीला सामोरे जावे लागले होते आणि त्याला निलंबित देखील केले जाऊ शकते.
मार्नस लाबुशेनच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीबद्दल बोलायचे झाले, तर त्याने 50 कसोटी, 52 एकदिवसीय आणि 1 टी20 सामना खेळला आहे. 50 कसोटी सामन्यात त्याने 49.56च्या सरासरीने 4,114 धावा केल्या आहेत. दरम्यान त्याने 20 अर्धशतकांसह 11 शतके झळकावली आहेत. कसोटीमध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 215 राहिली आहे. 52 एकदिवसीय सामन्यात त्याने 37.63च्या सरासरीने 1,656 धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 11 अर्धशतके आणि 2 शतके आहेत. 1 टी20 सामन्यात त्याने 2 धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
जेतेपद गमावले, तरीही छप्परतोड कमाई; वनडे विश्वचषक 2023 नंतर भारताने कमावले 11 हजार कोटी
‘हा’ खेळाडू धोनीपेक्षा उत्कृष्ट, दिग्गजाने स्पष्टच सांगितले
21व्या वर्षी 150च्या वेगाने गोलंदाजी.. बांगलादेशच्या वेगवान गोलंदाजापासून भारतीय फलंदाजाना राहावं लागेल सावध!