---Advertisement---

रसेलच्या तूफान फटकेबाजीने बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा उडाला थरकाप, टी२०त पहिल्यांदाच केला ‘हा’ पराक्रम

On: रविवार, जुलै 11, 2021 10:18 AM
---Advertisement---

ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात वेस्ट इंडिज संघाने उत्कृष्ट खेळाचा नमुना सादर करत १८ धावांनी विजय मिळवला आहे. या सामन्यात वेस्ट इंडिज संघाला विजय मिळवून देण्यात आंद्रे रसेल आणि ओबेद मॅक्कोयने मोलाची भूमिका बजावली.

एकीकडे फलंदाजी करताना रसेलने अवघ्या २८ चेंडूत ५१ धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर वेस्ट इंडिज संघाला १४५ धावा करण्यात यश आले होते. तर दुसरीकडे गोलंदाजी करताना मॅक्कोयने ४ गडी बाद केले आणि ऑस्ट्रेलियन संघाचा डाव १६ षटकात १२७ धावांवर संपुष्टात आणला. ओबेद मॅक्कोयला आपल्या अप्रतिम गोलंदाजीमुळे सामनावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते.  (Austrelia collapse in run chase after west indies post 145 in first T20I russell slams maiden half century)

रसेलने झळकावले पहिलेवहिले टी-२० आंतरराष्ट्रीय अर्धशतक
दरम्यान वेस्ट इंडिज संघाचा विस्फोटक फलंदाज आंद्रे रसेलने ५१ धावांची तुफानी खेळी केली होती. रसलने ५१ धावांच्या खेळीमध्ये ३ चौकार आणि ५ षटकार लगावले होते. अवघ्या २६ चेंडूत त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले होते.

जेव्हा आंद्रे रसेल फलंदाजी करण्यासाठी मैदानावर आला होता. तेव्हा वेस्ट इंडिज संघाच्या धावा ११.५ षटकात ४ बाद ६५ इतक्या होत्या. त्यानंतर मैदानावर आंद्रे रसेल नावाचे वारे पसरले होते. त्याने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर हल्लाबोल करत अर्धशतकाला गवसणी घातली. या सामन्यातील अर्धशतक हे त्याचे आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधील पहिलेवहिले अर्धशतक आहे. २०११ मध्ये टी२० पदार्पण केल्यानंतर तब्बल १० वर्षांनी त्याने पहिले अर्धशतक केले आहे.

https://twitter.com/MazherArshad/status/1413665352869896199?s=20

याबरोबरच ५ षटकार मारत आंद्रे रसेलने ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेटमध्ये एकूण ४८८ षटकारांचा आकडा गाठला आहे. आश्चर्यकारक बाब अशी की, त्याने चौकारपेक्षा षटकार अधिक लगावले आहेत. त्याने १०३ मीटरचा लांबच लांब षटकार खेचत आपले अर्धशतक पूर्ण केले होते.

महत्वाच्या बातम्या-

कोपा अमेरिका: अंतिम सामन्यात अर्जेंटिनाचा ब्राजीलवर १-०ने विजय, २८ वर्षांच्या प्रतिक्षेवर अंकुश

हरलीन देओलच्या झेलाचा ‘मास्टर-ब्लास्टर’ सचिनही झाला फॅन; ‘या’ शब्दात केले कौतुक

श्रीलंकेचा आणखी एक खेळाडू सापडला कोरोनिबाधित, नुकताच झाला होता वरिष्ठ संघात सामील

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---