आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेचा अंतिम सामना दुबईच्या दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात बलाढ्य ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ आमने सामने होते. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तर प्रथम फलंदाजी करत असलेल्या न्यूझीलंड संघाला १७२ धावा करण्यात यश आले होते. या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया संघाने ८ गडी राखून विजय मिळवला आणि जेतेपदावर आपले नाव कोरले आहे. या विजयासह ऑस्ट्रेलिया संघांच्या नावे मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.
ऑस्ट्रेलिया संघ हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बलाढ्य संघांपैकी एक आहे. ऑस्ट्रेलिया संघाने वनडे विश्वचषक स्पर्धेत आपला दबदबा निर्माण केला होता. १९८७ साली ॲलेन बॉर्डर यांनी पहिल्यांदा वनडे विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलिया संघाला विजय मिळवून दिला होता. त्यानंतर आतापर्यंत ऑस्ट्रेलिया संघाने ५ विश्वचषक स्पर्धेत जेतेपद मिळवले. तसेच आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत विजय मिळवून ऑस्ट्रेलिया संघ ५ वेगवेगळ्या दशकात विश्वचषक स्पर्धा जिंकणारा एकमेव संघ ठरला आहे.
आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या ६ हंगामात ऑस्ट्रेलिया संघाला एकही जेतेपद मिळवता आले नव्हते. परंतु आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत आरोन फिंचच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाने इतिहास रचला आणि जेतेपद आपल्या नावावर केले. यापूर्वी ऑस्ट्रेलिया संघाने १९८७ वनडे विश्वचषक, १९९९ वनडे विश्वचषक, २००३ वनडे विश्वचषक, २००७ वनडे विश्वचषक, २०१५ वनडे विश्वचषक आणि आता टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत विजय मिळवून ऑस्ट्रेलिया संघाने प्रत्येक दशकात विश्वचषक स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला आहे.
तसेच ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात झालेल्या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. न्यूझीलंड संघाकडून प्रथम फलंदाजी करताना केन विलियमसनने सर्वाधिक ८५ धावांची खेळी केली. तर मार्टिन गप्टीलने २८ धावांचे योगदान दिले. या खेळीच्या जोरावर न्यूझीलंड संघाला २० षटक अखेर ४ बाद १७२ धावा करण्यात यश आले होते. या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया संघाकडून मिचेल मार्शने नाबाद ७७ धावांची तर डेविड वॉर्नरने ५३ धावांची खेळी करत ऑस्ट्रेलिया संघाला ८ गडी राखून विजय मिळवून दिला.
महत्वाच्या बातम्या –