क्विन्सलँड। ऑस्ट्रेलिया महिला संघ विरुद्ध भारतीय महिला संघ यांच्या गुरुवारपासून (३० सप्टेंबर) ऐतिहासिक दिवस-रात्र कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. कॅरारा ओव्हल स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्याच्या पहिल्याच दिवशी पावसाचा अडथळा आला. त्यामुळे पहिल्या दिवसाचा खेळ ४४.१ षटकानंतर थांबवण्यात आला आहे.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून भारतीय महिला संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. भारतीय महिला संघानेही याचा फायदा घेत चांगली सुरुवात केली. भारताकडून स्म्रीती मंधना आणि शेफाली वर्मा सलामीला फलंदाजीसाठी उतरल्या या दोघींनी शानदार सुरुवात केली. त्यांनी अर्धशतकी भागीदारी केली.
मात्र, खेळपट्टीवर स्थिरावल्यानंतर शेफाली २६ व्या षटकात ६४ चेंडूत ३१ धावा करुन बाद झाली. तिने या खेळीत ४ चौकार मारले. तिला सोफी मोलिनेक्सने ताहलिया मॅकग्राकरवी झेलबाद केले. त्यामुळे मंधना आणि शेफाली यांनी ९३ धावांची भागीदारी तुटली. पण, त्यानंतर पुनम राऊतने मंधनाला भक्कम साथ देत भारताचा डाव पुढे नेला. दरम्यान, मंधनाने तिच्या कसोटी कारकिर्दीतील तिसरे अर्धशतक झळकावले.
पुनम आणि मंधना यांची जोडी खेळपट्टीवर स्थिरावलेली असतानाच ४५ व्या षटकादरम्यान पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे पंचांनी खेळ थांबवण्याचा निर्णय घेतला. काहीवेळ वाट पाहिल्यानंतरही वातावरणात बदल न झाल्याने पहिल्या दिवसाचा खेळ संपवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रावारी (१ ऑक्टोबर) अर्धातास लवकर खेळाला सुरुवात होईल. म्हणजे भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ९.३० वाजता खेळ सुरु होईल.
पहिल्या दिवसाखेर ४४.१ षटकात भारताने १ बाद १३२ धावा केल्या आहेत. मंधना १४४ चेंडूत १५ चौकार आणि १ षटकारासह ८० धावांवर नाबाद खेळत आहे. तर, पुनम राऊत १६ धावांवर नाबाद आहे.
Rain plays spoilsport at the Carrara Oval, forcing early stumps on the opening day of the #AUSvIND Test.
India are 132/1 with Smriti Mandhana on 80* and Punam Raut on 16*.
📝 https://t.co/cKISkEvPH4 pic.twitter.com/5PxvDFm8rf
— ICC (@ICC) September 30, 2021
तब्बल १५ वर्षांनी ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी सामना
भारतीय महिला संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध तब्बल १५ वर्षांनंतर कसोटी सामना खेळत आहे. यापूर्वी या दोन संघात २००६ साली ऍडलेड येथे कसोटी सामना खेळवण्यात आला होता, ज्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला होता. त्याचबरोबर सध्या सुरु असलेला कसोटी सामना भारतीय महिला संघाचा पहिलाच दिवस-रात्र कसोटी सामना आहे. त्यामुळे भारतीय संघासाठी हा सामना ऐतिहासिक आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
टी२० विश्वचषकाच्या संघातून हार्दिकला वगळले जाणार? ‘या’ कारणास्तव निवडीवर उपस्थित होतायेत प्रश्न
धोनी आणि विलियम्सनच्या नेतृत्वात भिडणार चेन्नई-हैदराबाद, पाहा दोन्ही संघांची संभावित प्लेइंग इलेव्हन
तब्बल २० वर्षांनी मंधनाने ऑस्ट्रेलियात केला ‘तो’ कारनामा, ठरली जगातील दुसरीच महिला क्रिकेटर