राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील लढत गुरुवारी (28 मार्च) चाहत्यांना पाहायला मिळाली. जयपूरमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना 5 बाद 185 धावा केल्या. प्रत्युत्तरात दिल्ली कॅपिटल्स संघ 20 षटकात 5 धावांपर्यंत मजल मारू शकला. राजस्थानने या सामन्यात 12 धावांनी विजय मिळवला.
दिल्ली कॅपिटल्सला या सामन्यात विजयासाठी 186 धावांचे लक्ष्य मिळाले होते. सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याने 34 चेंडूत 49 धावा केल्या. तसेच पाचव्या क्रमांकावर ट्रिस्टन स्टब्स याने 23 चेंडूत 44* धावांचे योगदान दिले. सलामीवीर मिचेल मार्श 12 चेंडूत 23, तर कर्णधार रिषभ पंत 26 चेंडूत 28 धावांची खेळी केली. अभिषेक पोरेल 10 चेंडूत 9 धावांची खेळी केली. अक्षर पटेल याने 13 चेंडूत 15 धावा केल्या. राजस्थान रॉयल्स नांद्रे बर्गर याने 3 चेंडूत 29 धावा खर्च करून 2 विकेट्स घेतल्या. युझवेंद्र चहल याने 3 षटकात 19 धावा खर्च 2 विकेट्स घेतल्या. आवेश खान याने 4 षटकात 29 धावा देत एक विकेट नावावर केली.
शेवटच्या षटकात दिल्लीला विजयासाठी 17 धावांची आवश्यकता होती. आवेश खान या षटकात एकाही चेंडूवर मोठा शॉट मारून दिला नाही. षटकातील पहिल्या, तिसऱ्या, चौथ्या आणि सहाव्या चेंडूवर दिल्लीच्या फलंदाजांनी प्रत्येकी एक-एक धाव घेतली आणि 4 विकेट्स घेतल्या. या विजयानंतर राजस्थान रॉयल्सने सीएसकेप्रमाणे सलग दोन विजय मिळवले. असे असले तरी, सीएसके नेट रन रेटच्या जोरावर पहिल्या, आणि राजस्थआन दुसऱ्या क्रमांकावर आहे.
RAJASTHAN DEFEATED DELHI IN JAIPUR & MAKES IT 2 WINS IN 2 GAMES. 🔥⭐ pic.twitter.com/ib1w2nUjtn
— Johns. (@CricCrazyJohns) March 28, 2024
तत्पूर्वी दिल्ली कॅपिटल्सने या सामन्याची नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. रियान पराग याने अवघ्या 45 चेंडूत 85* धावांची वादळी खेळी केली. पण संघातील इतर एकही फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही. सलामीवीर यशस्वी जयस्वाल 5, जोस बटलर 11, कर्णधार संजू सॅमसन 15, रविचंद्रन अश्विन 29, ध्रुव जुरेल 20, शिमरॉन हेटमायर 14* धावांची खेळी करू शकला. कायल मेयर्स, मुकेश कुमार, एन्रिक नॉर्टजे, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव या पाचही गोलंदाजांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.
दिल्ली कॅपिटल्सः 1 डेव्हिड वॉर्नर, 2 मिचेल मार्श, 3 रिकी भुई, 4 ऋषभ पंत (कर्णधार, विकेटकीपर), 5 ट्रिस्टन स्टब्स, 6 अक्षर पटेल, 7 सुमित कुमार, 8 कुलदीप यादव, 9 एनरिक नॉर्टजे, 10 खलील अहमद, 11 मुकेश कुमार
इम्पॅक्ट प्लेअर्स: अभिषेक पोरेल, जेक फ्रेझर-मॅकगुर्क, प्रवीण दुबे, कुमार कुशगरा, रसिक दार
राजस्थान रॉयल्स: 1 जोस बटलर, 2 यशस्वी जैस्वाल, 3 संजू सॅमसन (कर्णधार, विकेटकीपर), 4 रियान पराग, 5 शिमरॉन हेटमायर, 6 ध्रुव जुरेल, 7 आर अश्विन, 8 ट्रेंट बोल्ट, 9 आवेश खान, 10 संदीप शर्मा, 11 युजवेंद्र चहल
इम्पॅक्ट प्लेअर्स: रोवमन पॉवेल, नांद्रे बर्गर, तनुष कोटियन, शुभम दुबे, कुलदीप सेन