भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना रविवार दिनांक २४ जुलै रोजी त्रिनिनाद येथ पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने ३१२ धावांचा पाठलाग करत विजय मिळवला. या सामन्यात भारतीय संघात एक महत्वाचा बदल करण्यात आला होता. पहिल्या सामन्यात विशेष कामगिरी करण्यास असफल ठरलेल्या प्रसिद्ध कृष्णाला संघातून बाहेरचा रस्ता दाखवत आवेश खान याला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. मात्र, आवेश खान या संधीचे सोनं करण्यास अपयशी ठरला. पहिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना खेळणारा आवेश खान चांगलाच महागात पडला. आवेश खानने ६ षटके टाकली ज्यात त्याने ९च्या सरासरीने ५४ धावा दिल्या आणि त्याला एकही विकेट मिळाली नाही.
या वर्षी टी२० मध्ये पदार्पण केले
उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज आवेश खानने यावर्षी फेब्रुवारीमध्ये कोलकाता येथील ईडन गार्डन्स मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्ध टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आवेश खानने आतापर्यंत 9 टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत ज्यात त्याने २९.३७ च्या सरासरीने ८ विकेट्स घेतल्या आहेत. आवेश टी२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी म्हणजे १८ धावांत ४ बळी अशी आहे. २५ वर्षीय आवेश खाननेही आयपीएल २०२२मध्ये चमकदार कामगिरी केली. आवेशने लखनौ सुपर जायंट्स (एलएसजी) साठी एकूण १३ सामन्यांमध्ये भाग घेतला. यादरम्यान आवेश खानने २३.११ च्या सरासरीने १८ विकेट घेतल्या.
भारतासमोर ३१२ धावांचे लक्ष्य होते
या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने निर्धारित षटकात ६ बाद ३११ धावा केल्या. शाई होपने १२५ चेंडूत ८ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ११५ धावा केल्या. तर कर्णधार निकोलस पूरनने ७४ आणि काइल मेयर्सने ३९ धावांचे योगदान दिले. भारताकडून शार्दुल ठाकूरला सर्वाधिक तीन यश मिळाले. तर दीपक हुडा, युझवेंद्र चहल आणि अक्षर पटेल यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
दरम्यान, या सामन्यात भारतासाठी अक्षर पटेलने अष्टपैलू खेळी करत गोलंदाजी मध्ये एक विकेट तर फलंदाजी मध्ये महत्वपूर्ण अशा ३५ चेंडूत ६४ धावा केल्या. शिवाय सामन्यात ३ चेंडूत भारताला विजयासाठी ६ धावांची गरज असताना विजयी षटकार लगावत सामन्याचा शेवट केला. त्यामुळे अक्षर पटेलला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
अर्धशतक ठोकत श्रेयसने वनडे संघातील स्थान केले मजबूत, ‘या’ बाबतीत शंभरीही केली पूर्ण
चेंडू मारायचा एकीकडे होता, पण गेला दुसरीकडे; पाहा शुबमन गिलने विचित्र पद्धतीने गमावलेली विकेट
WI vs IND | वेस्ट इंडीजविरुद्ध मिळालेल्या यशाचे श्रेय आयपीएललाचं, वाचा शिखर धवन काय म्हणाला