वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या टी२० सामन्यात भारतीय संघाने ५९ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात भारताकडून फलंदाजी करताना यष्टीरक्षक रिषभ पंत याने चांगले योगदान दिले. तर गोलंदाजीत अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई, अक्षर पटेल यांच्याबरोबर आवेश खान यानेही मोलाचा हातभार लावला. मागील टी२० सामन्यातील सरासरी प्रदर्शनानंतर आवेशने केलेल्या शानदार प्रदर्शनाचे कौतुक त्याला सामनावीर पुरस्कार देत करण्यात आले. यानंतर त्याने आपल्या पुनरागमनाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या मागील २ टी२० सामन्यात अर्थात दुसऱ्या व तिसऱ्या सामन्यात मिळून आवेशने एकच विकेट घेतली होती. त्यामुळे वेस्ट इंडिजविरुद्धच्या (WI vs IND) टी२० मालिकेतील त्याचा इकोनॉमी रेट १९४ च्या पुढे गेला होता. परंतु आता चौथ्या टी२० सामन्यात (Fourth T20I) थेट २ विकेट्स घेत त्याच्या इकोनॉमी रेटमध्ये चांगलीच सुधारणा झाली आहे. त्याचा टी२० मालिकेतील इकोनॉमी रेट ११ च्याही खाली आला आहे.
आवेशने (Avesh Khan) वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या टी२० सामन्यात ४ षटके फेकताना फक्त १७ धावा खर्च करत २ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने ब्रेंडन किंग आणि डिवॉन थॉमस यांच्या महत्त्वपूर्ण विकेट्स मिळवून दिल्या. यादरम्यान त्याचा इकोनॉमी रेट ४.२५ इतका राहिला आहे. त्याने आपल्या पहिल्या २ षटकांमध्येच या विकेट्स मिळवल्या आहेत. त्याच्या या प्रदर्शनासाठी त्याला सामनावीर निवडण्यात (Avesh Khan Man Of The Match) आले.
सामनावीर पुरस्कार मिळाल्याचा आनंद व्यक्त करत आवेश म्हणाला की, “मला खूप चांगले वाटत आहे. मागच्या २ सामन्यात मला चांगले प्रदर्शन करता आले नव्हते. परंतु आजच्या सामन्यात मी फक्त माझ्या गोलंदाजी शैलींवर लक्ष दिले. मी हार्ड लेंथवर गोलंदाजी केली. माझे प्रशिक्षक आणि माझे कर्णधार यांनी मला सांगितले होते की, ते मला पूर्णपणे समर्थन करत आहेत. ते मला माझ्या चांगल्या प्रदर्शनासह माझ्या पुनरागमनबद्दल माझ्याशी बोलले.”
तसेच पुढे बोलताना आवेश आगामी सामन्यात आपले सर्वोत्कृष्ट देण्यासाठी प्रयत्नशील असेल, असे म्हणाला. तो म्हणाला की, “मी पुढील सामन्यावर लक्ष देत आहे. चेंडू फ्लोरिडाच्या मैदानावरील खेळपट्टीवर थोडा थांबून येत होता आणि याचमुळे मी माझ्या संथ चेंडूंना हार्ड लेंथसोबत टाकत होतो, ज्याचा परिणाम मला २ विकेट्सच्या रूपात मिळाला आहे. हे मैदान भारतातील मैदानांसारखे वाटत आहे. तसेच मला आनंद आहे की, इतक्या मोठ्या प्रमाणात प्रेक्षक आम्हाला पाहायला आले.”
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
चार शब्द मोलाचे! कर्णधार रोहितचे ‘ते’ मार्गदर्शन करणारे बोल आवेशला बनवून गेले झिरोचा हिरो
उगाचच पंतला म्हणत नाही टॉपचा विकेटकिपर! ‘हा’ मोठा पराक्रम करत कार्तिकला टाकले बरेच मागे
धोनी, विराटला न जमलेला ‘हा’ विक्रम रचलाय कॅप्टन रोहितने, वाचा सविस्तर