आगामी टी-२० विश्वचषक अवघ्या काही दिवसांवर आला आहे. विश्वचषकातील पहिला सामना १७ ऑक्टोबरला खेळला जाईल. आयपीएल २०२१ मध्ये सर्वाधिक वेगवान चेंडू फेकण्याचा मान मिळवलेल्या उमरान मलिकला टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघासोबत नेट गोलंदाजाच्या रूपात सामील केले गेले आहे. उमराननंतर आता दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज आवेश खानलाही भारतीय संघासोबत नेट गोलंदाजाच्या रुपात सामील होण्यासाठी बीसीसीआयने सांगितले असल्याची माहिती समोर येत आहे.
बीसीसीआयच्या एका विश्वसनीय सूत्रांच्या मते, आवेश खानला टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघात राखीव खेळाडूच्या रूपातही संधी दिली जाऊ शकते. बीसीसीआयच्या सूत्राने पीटीआयशी याबाबत चर्चा केली आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, “राष्ट्रीय निवडकर्त्यांनी आवेशला संघासोबत जोडण्याचा निर्णय घेतला आहे. आता तो नेट गोलंदाजाच्या रूपात भारतीय संघात सामील होईल. पण जर संघ व्यवस्थापनाला वाटले, तर त्याला मुख्य संघातही सामील केले जाऊ शकते.”
सूत्राने पुढे सांगितले की, “आवेश १४२ ते १४५ किमीच्या सरासरी वेगाने गोलंदाजी करतो. सपाट खेळटप्पीवरही चांगली झेप मिळवतो आणि मागच्या काही काळापासून सपोर्ट स्टाफची त्याचावर नजर आहे.” आवेश याआधी भारतीय कसोटी संघासोबत राखीव खेळाडूच्या रूपात इंग्लड दौऱ्यावरही गेला होता. मात्र, त्यावेळी सराव सामन्यादरम्यान त्याच्या बोटाला दुखापत झाली आणि त्याला मायदेशात परतावे लागले होते.
आवेशने आयपीएलच्या या हंगामात ज्याप्रकारे प्रदर्शन करून दाखवले आहे, त्याच्या जोरावर बीसीसीआयने हा निर्णय घेतला असावा अशी चर्चा आहे. त्याने आयपीएलच्या चालू हंगामात दिल्ली कॅपिटल्ससाठी २३ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच चालू हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्यांच्या यादीत आवेशचा दुसरा क्रमांक लागतो. पहिल्या क्रमांकावर हर्षल पटेल आहे. त्याने ३२ विकेट्स घेतल्या आहेत.
भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या विश्वचषकात भारतीय संघासोबत समील होणार आहे. तो गोलंदाजी करण्यासाठी फिट नसल्यामुळे तो फलंदाजाच्या रूपात खेळण्याची शक्यता आहे. अशात महिती समोर आली आहे की, कोलकाता नाइट रायडर्सचा अष्टपैलू खेळाडू वेंकटेश अय्यरला हार्दिकच्या पर्यायी खेळाडूच्या रूपात टी२० विश्वचषकासाठी सामील केले जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
कर्णधार म्हणून अंतिम सामन्यात कोहलीच्या हाती निराशा; ‘तुझा अभिमान आहे’, म्हणत बहिणीने वाढवलं मनोबल
‘या’ क्रिकेटरची बड्डेदिनी स्वत:लाच ग्रेटभेट, शतक ठोकत मोडला मितालीचा २२ वर्षे जुना विक्रम
जवळचा मित्र कोहलीने कॅप्टन्सी सोडल्याने डिविलियर्स भावुक; म्हणाला, ‘त्याला पाहून एकच शब्द आठवतो…’