इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामाचा अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात पार पडला. शुक्रवारी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने बाजी मारत चौथ्यांदा आयपीएल विजेतेपदाला गवसणी घातली. या अंतिम सामन्यासह आयपीएलच्या १४ व्या हंगामाची सांगता झाली.
आयपीएल २०२१ मध्ये अनेक खेळाडू चमकले, कोणी फलंदाजीत , तर कोणी गोलंदाजीत कमाल दाखवली. अनेक खेळाडूंनी उत्तम क्षेत्ररणाचे प्रदर्शन करताना सर्वांची वाहवा मिळवली. अशाच सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंवर आयपीएलकडून पुरस्कारांचा वर्षाव झाला. यंदाच्या पुरस्कारांच्या यादीत कोणा कोणाची नावे आली आहेत हे थोडक्यात पाहू या.
आयपीएल २०२१ चे पुरस्कार
विजेते- चेन्नई सुपर किंग्स
उपविजेते- कोलकाता नाईट रायडर्स
अंतिम सामन्यातील सामनावीर- फाफ डू प्लेसिस, चेन्नई सुपर किंग्स
ऑरेंज कॅप- ऋतुराज गायकवाड (६३५ धावा), चेन्नई सुपर किंग्स
पर्पल कॅप- हर्षल पटेल (३२ विकेट्स), रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
सर्वाधिक षटकार – केएल राहुल (३० षटकार), पंजाब किंग्स
एमर्जिंग प्लेअर- ऋतुराज गायकवाड, चेन्नई सुपर किंग्स
सर्वोत्तम झेल – रवी बिश्नोई (सामना २१, फलंदाज – सुनील नारायण), पंजाब किंग्स
सुपर स्ट्रायकर ऑफ द सिजन – शिमरॉन हेटमायर, दिल्ली कॅपिटल्स
गेम चेंजर – हर्षल पटेल, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
पॉवर प्लेअर – व्यंकटेश अय्यर, कोलकाता नाईट रायडर्स
व्यॅल्युएबल प्लेअर- हर्षल पटेल, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
फेअर प्ले अवॉर्ड- राजस्थान रॉयल्स
महत्त्वाच्या बातम्या –
भन्नाटच! जडेजाने घेतले अय्यर अन् नरेनचे अफलातून झेल; पाहून तुम्हीही कराल प्रशंसा
आयपीएलमधील विजेत्या संघाकडून ‘अशी’ कामगिरी करणारा ऋतुराज उथप्पानंतरचा दुसराच फलंदाज
आयपीएल २०२१ अन् टी२० विश्वचषकाच्या विजेत्या संघाच्या बक्षीस रकमेत तब्बल ८ कोटींचा फरक; वाचा आकडा