अहमदाबाद। भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात अहमदाबाद येथे चालू असलेला तिसरा कसोटी सामना अतिशय रोमांचक झाला. दिवस-रात्र कसोटी सामना असलेल्या या सामन्यात अक्षर पटेलने दोन्ही ५ विकेट् घेतल्या. यासह त्याने खास विक्रमही केला आहे.
पुर्नबांधणी केेलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरु असलेल्या या सामन्यात अक्षरने पहिल्या डावात २१.४ षटकात ३८ धावा देत ६ विकेट्स घेतल्या होत्या. याबरोबरच त्याने दुसऱ्या डावात त्याने १५ षटकात ३२ धावा देत ५ विकेट्स घेतल्या. यासह त्याने ११ विकेट्स घेतल्या.
त्यामुळे दिवस-रात्र कसोटीमध्ये एका सामन्यात ११ विकेट्स घेणारा अक्षर पटेल हा पहिलाच गोलंदाज ठरला आहे. याआधी असा विक्रम कोणालाच करता आला नव्हता.
पहिल्या २ सामन्यात तीन डावात ५ विकेट्स
अक्षरने या सामन्यात दोन्ही डावात ५ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेतल्या, हा अक्षरचा कसोटी कारकिर्दीतील दुसराच सामना आहे. विशेष म्हणजे त्याने चेन्नईला झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात पदार्पण करताना दुसऱ्या डावात ५ विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे तो कसोटी कारकिर्दीतील पहिल्या दोन्ही सामन्यातील ३ डावात ५ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेणारा भारताचा दुसराच गोलंदाज ठरला. तर असा पराक्रम करणारा जगातील एकूण सातवा गोलंदाज ठरला आहे.
अक्षरपूर्वी भारताकडून नरेंद्र हिरवानी यांनी असा कारनामा केला होता. हिरवानी यांनी तर १९८८ साली चेन्नई येथे वेस्ट इंडिज विरुद्ध पदार्पण करताना दोन्ही डावात प्रत्येकी ८ विकेट्स घेतल्या होत्या. तर न्यूझीलंडविरुद्ध बंगळुरु येथे दुसरा सामना खेळताना त्यांनी दुसऱ्या डावात ६ विकेट्स घेतल्या होत्या.
अक्षरची घरच्या मैदानातील कामगिरी
विशेष म्हणजे अहमदाबादचे नरेंद्र मोदी स्टेडियम अक्षरचे घरचे मैदान आहे. त्यामुळे त्याच्यासाठी हा सामना आणखी खास आहे. या सामन्यात अक्षरने पहिल्या डावात जॅक क्रॉली, बेन स्टोक्स, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स, जोफ्रा आर्चर आणि स्टुअर्ट ब्रॉड यांना बाद केले. तर दुसऱ्या डावाची सुरुवात त्याने जबरदस्त केली. त्याने दुसऱ्या डावाच्या पहिल्याच षटकात जॅक क्रॉली आणि जॉनी बेअरस्टो यांना त्रिफळाचीत केले. त्यानंतर त्याने डॉमनिक सिब्ली, जो रुट आणि बेन फोक्स यांना बाद करत या डावातील ५ विकेट्स पूर्ण केल्या.
कारकिर्दीतील पहिल्या २ कसोटीत सर्वाधिक डावात ५+ विकेट्स घेणारे गोलंदाज
३ डाव – अक्षर पटेल (भारत)
३ डाव – नरेंद्र हिरवानी (भारत)
३ डाव – सिडनी बार्ने्स (इंग्लंड)
३ डाव – क्लॅरी ग्रिमेट (ऑस्ट्रेलिया)
३ डाव – रॉडनी हॉग (ऑस्ट्रेलिया)
३ डाव – थॉमस रिचर्डसन (इंग्लंड)
३ डाव – मेहदी हसन (बांगलादेश)
महत्त्वाच्या बातम्या –
विक्रमादित्य अश्विन! सगळ्यात जलद ४०० बळी घेणारा ठरला विश्वातील दुसरा गोलंदाज
आधी अश्विन आता अक्षर, १०० वर्षानंतर ‘असा’ पराक्रम करण्यात मिळालंय यश
व्हिडिओ : अक्षर पटेलच्या फिरकी जाळ्यात अडकला इंग्लिश सलामीवीर, रिषभ पंतने घेतला शानदार झेल