---Advertisement---

टीम इंडियासाठी आनंदाची बातमी! टी20 वर्ल्ड कपपूर्वी अष्टपैलू खेळाडूचे शानदार शतक

On: शनिवार, जानेवारी 3, 2026 3:23 PM
---Advertisement---

भारतामध्ये सध्या देशांतर्गत क्रिकेटमधील प्रतिष्ठित विजय हजारे ट्रॉफीचे सामने रंगतदार होत आहेत. 30 डिसेंबर रोजी एलिट ग्रुप ‘डी’ मधील एका महत्त्वाच्या सामन्यात गुजरात आणि आंध्र प्रदेश यांच्यात लढत झाली. हा सामना बंगळुरूजवळील केएससीए क्रिकेट ग्राउंड, अलूर येथे खेळवण्यात आला. या सामन्यात गुजरातकडून खेळणाऱ्या टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलने अप्रतिम फलंदाजी करत शानदार शतक झळकावले.

गुजरातने प्रथम फलंदाजी स्वीकारत 50 षटकांत 9 गडी बाद 318 धावांचा भक्कम डोंगर उभा केला. या डावात अक्षर पटेलने क्रमांक पाचवर फलंदाजीस येत संघाची धुरा सांभाळली. डावाच्या मध्यापासून शेवटपर्यंत त्याने संयमी पण आक्रमक खेळ करत आंध्रच्या गोलंदाजांवर दबाव ठेवला. अक्षरने 98 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. हा त्याच्या लिस्ट ‘ए’ कारकिर्दीतील पहिला शतक ठरला.

अक्षरने डावात 9 चौकार आणि 2 षटकारांची आतषबाजी केली. अखेरीस तो 111 चेंडूत 130 धावा काढून बाद झाला. आंध्रकडून एम. अंजनेयुलूने त्याला क्लिन बोल्ड केला. यापूर्वी अक्षरने लिस्ट ‘ए’ क्रिकेटमध्ये 12 अर्धशतके झळकावली होती, तर त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 98 इतकी होती. अखेर या सामन्यात त्याला शतकाचा अडथळा पार करता आला.

अक्षर पटेल या विजय हजारे ट्रॉफी हंगामात प्रथमच गुजरातकडून मैदानात उतरला आहे. आतापर्यंत त्याने एकूण 171 लिस्ट ‘ए’ सामने खेळले असून, त्यात भारतासाठी खेळलेले 71 वनडे सामन्यांचा समावेश आहे. या फॉरमॅटमध्ये त्याने 2850 पेक्षा अधिक धावा केल्या असून सरासरी सुमारे 30 आणि स्ट्राईक रेट 94 पेक्षा जास्त आहे. गोलंदाज म्हणूनही त्याचा प्रभाव मोठा असून, 4.30 च्या इकॉनॉमी रेटने त्याने 203 विकेट्स घेतल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---