भारतीय संघ युएई येथे सुरू असलेल्या आशिया चषक (Asia Cup) 2022च्या स्पर्धेत उत्तम कामगिरी करत आहे. या स्पर्धेत भारताने पाकिस्तान पाठोपाठ हाँगकाँगचा पराभव करत सुपर फोरमध्ये प्रवेश केला आहे. सगळे चांगले सुरू असताना संघाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा मुख्य अष्टपैलू खेळाडू दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर झाला आहे.
भारताचा महत्वाचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) हा गुडघ्याच्या दुखापतीमुळे संघाबाहेर झाला आहे. यामुळे तो या स्पर्धेतील बाकी सामन्यांना मुकणार आहे. सध्या तो भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) यांच्या वैद्यकिय पथकाच्या देखरेखीखाली आहे.
जडेजाच्या जागी अक्षर पटेल (Axar Patel) याची जागी संघात वर्णी लागली आहे. तो आशिया चषकासाठी राखीव खेळाडूमध्ये उपस्थित होता. यामुळे तो लवकरत दुबईमध्ये संघाशी जोडला जाणार आहे.
https://twitter.com/BCCI/status/1565665616391901184?s=20&t=gecL8qOHKgGSSHs4LJKzBA
जडेजा हा मागील काही काळापासून भारतासाठी क्रिकेटच्या तिन्ही प्रकारामध्ये चमकदार कामगिरी करत आहे. त्याने आशिया चषकातमध्ये पाकिस्तान विरुद्धच्या अतिमहत्वाच्या सामन्यात सामनाविजयी खेळी केली होती. त्याने चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येत 29 चेंडूत 35 धावा केल्या होत्या. यामध्ये त्याने 120.69च्या स्ट्राईक रेटने 2 चौकार आणि 2 षटकार मारले होते.
तसेच जडेजाने हार्दिक पंड्या सोबत पाचव्या विकेटसाठी 52 धावांची भागीदारी केली होती. यामुळेच भारताने पाकिस्तान विरुद्धचा सामना 5 विकेट्सने जिंकला होता. तर हाँगकाँग विरुद्ध त्याला फलंदाजीची संधी मिळाली नसली तरी त्याने गोलंदाजीत कमाल केली. त्याने 4 षटकात 3.75च्या इकोनॉमी रेटने गोलंदाजी करत 15 धावा दिल्या आणि एक विकेटही घेतली. यामुळे दोन्ही विजयामध्ये त्याने महत्वाची भुमिका निभावली. तो आता संघाबाहेर झाल्याने भारताच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
एशिया कपसाठी भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, दीपक हुड्डा, दिनेश कार्तिक, सूर्यकुमार यादव, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, भुवनेश्वर कुमार, आवेश खान.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘दिलसे नही दिमाग से खेलना होगा!’ पराभवानंतर कर्णधार शाकिबने पिळले बांग्लादेश संघाचे कान
‘बाऊंड्री लाईनवर उडता कायरन पाहिलात का?’ पोलार्डने घेतलेला अप्रतिम झेल एकदा बघाच
तर ‘हा’ आहे भारतीय संघातील सर्वात कंजूस खेळाडू, शिखर धवनचा मजेशीर खुलासा






