भारताने झिम्ब्बवे विरुद्धची वनडे मालिका जिंकली. मात्र, यावेळी युवा फलंदाज सुबमन गिलने सर्वात जास्त प्रभावित केलं. त्याला मालिकावीर पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले. त्यानंतर अनेकांनी त्याच्यावर शुभेच्छा आणि कौतुकांचा वर्षाव केला. अशातच भारताचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलनेही शुबमनच्या फलंदाजीतील खास गोष्ट सांगत त्याच कौतुक केलं आहे.
“तो सतत एक-दोन धावा काढत राहतो आणि जास्त डॉट बॉल खेळत नाही. माझ्या मते, हा त्याच्यासाठी सर्वात मोठा सकारात्मक मुद्दा आहे. जेव्हा तो फलंदाजी करतो तेव्हा तो स्ट्राईक अतिशय चांगल्या पद्धतीने रोटेट करतो. याशिवाय तो खराब चेंडूंना चौकारांमध्ये रूपांतरित करतो”, असं म्हणत अक्षर पटेलने शुबमन गिलचे खास कौतुक केले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
..म्हणूनच इंडियन सर्वांच्या हृदयावर राज्य करतात! शतकवीर सिकंदरची भारतीय खेळाडूंनी थोपटली पाठ
द्रविडच्या अनुपस्थितीत भारताचे सारथ्य कोण करणार?; ‘ही’ तीन प्रमुख नावं चर्चेत