भारतीय क्रिकेट संघाला येत्या काही दिवसांत मायदेशात वेस्ट इंडिजविरुद्ध ३ सामन्यांची वनडे आणि टी२० मालिका खेळायची आहे. या मालिकेत रोहित शर्मा (Captain Rohit Sharma) पहिल्यांदाच भारतीय संघाचा पूर्णवेळ कर्णधार म्हणून मैदानात उतरणार आहे. परंतु या मालिका सुरू होण्यापूर्वीच भारतीय संघापुढील अडचणी वाढताना दिसत आहेत. नुकतेच भारताच्या ४ खेळाडूंसहित ७ सदस्य कोरोना संक्रमित झाले असल्याची चर्चा आहे. अशात आता अजून एक क्रिकेटपटू या यादीत सामील झाल्याचे समजत आहे.
टी२० संघात निवड झालेला अष्टपैलू अक्षर पटेल (Axar Patel) कोरोनाच्या विळख्यात (Axar Patel Corona Positive) सापडला आहे. अक्षरला दुखापतग्रस्त रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) याचा पर्यायी खेळाडू (Ravindra Jadeja Replacement) म्हणून संघात सहभागी केले होते. परंतु आता तोही कोरोनामुळे संघाबाहेर होण्याची शक्यता वाढल्याने कर्णधार रोहितची डोकेदुखी वाढली असावी.
माध्यमांतील वृत्तांनुसार, २८ वर्षीय अक्षर अद्याप भारतीय संघासोबत जोडला गेलेला नाही. तो सध्या अहमदाबादमध्ये त्याच्या घरी आहे. अहमदाबाद येथे भारतीय संघाला वनडे मालिका खेळायची आहे. परंतु अक्षर वनडे संघाचा भाग नसून तो कोलकाता येथे होणाऱ्या टी२० मालिकेचा भाग आहे. ही मालिका १६ फेब्रुवारीपासून सुरू होणार असल्याने अक्षरला कोरोनातून पूर्णपणे बरा होण्यासाठी बराच अवधी मिळेल.
हेही वाचा- भारत विरुद्ध वेस्ट इंडीज वनडे मालिकेचे भवितव्य अंधारात! बीसीसीआय घेऊ शकते मोठा निर्णय
भारतीय संघात कोरोनाचा स्फोट
अक्षरपूर्वी बुधवारी (०२ फेब्रुवारी) भारतीय संघातील तीन प्रमुख खेळाडू शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर आणि राखीव खेळाडू नवदीप सैनी हे देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. याव्यतिरिक्त संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप, मसाजीस्ट राजकुमार व अन्य एक सपोर्ट स्टाफ सदस्य कोरोना पॉझिटिव्ह असून या सर्वांना विलगीकरण ठेवण्यात आले आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध या कारणास्तव बीसीसीआयने सलामीवीर मयंक अगरवालला संघात सामील करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या सामन्यात रोहित शर्माचा जोडीदार म्हणून मयंक डावाची सुरुवात करताना दिसेल अशी अपेक्षा आहे.
सराव सत्रही झाले रद्द
सध्या भारतीय संघाचे सर्व खेळाडू अहमदाबाद येथे जमा झाले आहेत. भारतीय संघाचे पहिले सराव सत्र गुरुवारी (३ फेब्रुवारी) आयोजित केले जाणार होते. मात्र, संघातील ही परिस्थिती पाहता हे सराव सत्र रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील एका दिवसात आणखी काही खेळाडू कोरोनाबाधित आढळल्यास सदर वनडे मालिका पुढे ढकलण्यात येऊ शकते.
महत्त्वाच्या बातम्या-
कर्णधार यशच्या शतकानंतर लक्ष्मणच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता अभिमान, रिऍक्शनचा व्हिडिओ व्हायरल
अंडर-१९ विश्वचषकात ‘या’ ५ खेळाडूंनी दाखवली आपल्या गोलंदाजीची ताकद, ठरले कौतुकास पात्र
केरला ब्लास्टर्सचा विजयपथावर परतण्याचा प्रयत्न, अडखळणाऱ्या नॉर्थ ईस्ट युनायटेडचे आव्हान