भारत आणि बांगलादेश या संंघांमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने बांगलादेश 188 धावांनी दणदणीत विजय मिळवला. दुसऱ्या डावात विजयासाठी 513 धावांचे आव्हान असणाऱ्या बांगलादेश संघाला 324 धावा करता आल्या. बांगलादेशच्या दुसऱ्या डावात भारतीय फिरकीपटू त्यांच्या डोकेदुखीचे कारण ठरलेे. दुसऱ्या डावात भारताच्या अक्षर पटेल याने 4 गडी बाद करत भारताच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात नाव नोंदवले आहे. आपल्या कसोटी कारकीर्दीच्या पहिल्या 7 सामन्यात त्याने सर्वाधिक विकेेट घेतल्या.
भारतासाठी आपल्या पहिल्या 7 कसोटी सामान्यात सर्वाधिक विकेट घेण्याऱ्या गोलंदाजांच्या यादीत अक्षर पटेल (Axar Patel) पहिल्या क्रमांकावर विराजमान झाला आहे. आतापर्यंत खेळलेल्या 7 कसोटी सामन्यात त्याने 44 विकेट घेत आर अश्विन याला मागे पाडले. या यादीत जसप्रित बुमराह (Jasprit Bumrah) याचा देखील समावेश आहे. बुमराहने त्याच्या पहल्या 7 कसोटी सामन्यांमध्ये 34 विकेेट घेतल्या होत्या.
आपल्या पहिल्या 7 सामन्यात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांची यादी खालीलप्रमाणे
अक्षर पटेल-44
आर अश्विन-43
नरेंद्र हिरवानी-42
श्रीसंत/ रवींद्र जडेजा-35
जसप्रित बुमराह-34
दिलीप दोशी- 31
अनिल कुंबळे- 30
बांगालदेश विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने बांगलादेशवर 188 धावांनी दणदणीत विजय मिळवला. हा सामना जिंकल्याने भारताच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये जाण्याच्या अपेक्षा बळावल्या आहेत. भारताने नाणेफेक जिंकूण पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या डावात भारताने 404 धावा केल्या आणि दुसरा डाव 258 धावांवर घोषीत केला. बांगलादेशचा संघ पहिल्या डावात 150 धावांवर गारद झाला. तर दुसऱ्या डावात विजयासाठी त्यांना 512 धावांचे आव्हान मिळाले. दुसऱ्या डावात बांगलादेशची सुरुवात चांगली झाली, त्यांच्या सलामीवीरांनी शतकीय भागीदारी केली. मात्र, त्यांचे दोन गडी बाद झाल्यानंतर ठराविक अंतराने त्यांचे गडी बाद होत गेले आणि 324 धावांवर संघ सर्वबाद झाला. (Axar Patel topped as the highest Wicket taker in first 7 test matches)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ऐतिहासिक विजयाची दक्षिण आफ्रिकेला हुलकावणी! ब्रिस्बेन कसोटीत दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा संघर्षपूर्ण विजय
एसएफए अजिंक्यपद स्पर्धेत पीआयसीटी मॉडेल स्कुल संघाला विजेतेपद; जैनम, राजलक्ष्मी यांची लक्षवेधी कामगिरी