पाकिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज आझम खानचा फाॅर्म काय परतायचा नाव घेत नाही आहे. इंग्लंड विरुद्धच्या टी 20 मालिकेतही फलंदाजीत अपयशी ठरलेला आझम खान आता टी20 विश्वचषकातही निराशाजनक सुरुवात केली आहे. टी20 विश्वचषक 2024 च्या 11 व्या सामन्यात पाकिस्तान यजमान अमेरिकेविरुद्ध मैदानात उतरला होता. पाकिस्तानची सुरुवात खूपच वाईट झाली. संघाच्या पहिल्या पावरप्ले मध्ये 3 विकेट्स गमावल्या, त्यानंतर संघास सांभाळत बाबर आझम आणि शादाब खान यांनी 72 धावांची निर्णायक भागीदारी केली.
बाबर आणि शादाब यांची भागीदारी अमेरिकासाठी डोकेदुखी ठरत होती, तेव्हा नॉस्टुश केंजिगेने सलग दोन विकेट्स घेऊन पाकिस्तानच्या लयीला विराम लावला. 13 व्या षटकाच्या चाैथ्या चेंडूवर शादाब खान शाॅर्ट फाईन लेगवर कॅच आउट झाला. तर नंतरच्या चेंडूवर आझम खान आपली विकेट भेट म्हणून दिली आणि निघून गेला. केंजिगेने त्याला गोल्डन डक वर एलबीडब्लू केले. त्याचा चेंडू पडताच थोडासा वळला आणि आजम खानला कळेपर्यंत चेंडू पॅडवर लागला. गोलंदाजाने मोठे अपील केले आणि अंपायरने दोखील हात खडे केले. आझमनी रिव्यू घेतला पण उपयोग झाला नाही. अशाप्रकारे आझमने टी-20 विश्वचषकाची सुरुवात अत्यंत वाईट पद्धतीने झाली.
Azam khan looking at fans angrily…#T20WorldCup #PAKVUSA #worldcup2024 #T20WorldCup2024 #azamkhan #BabarAzam𓃵 #PakistanCricket pic.twitter.com/HlOq6wEfnU
— Bitta Chahal (@bittachaha) June 6, 2024
आझम खान शून्यावर बाद झाल्यानंतर डगआउट कडे परतत असताना एका चाहत्याने त्याची छेड काढण्यास सुरुवात केली. त्यावर आजम खानचा राग कोपला गेला, त्याने सरळ चाहत्यांशीच भिडला, ज्या पध्दतीने आजम खान चाहत्यावर राग व्यक्त करत होता त्यावरुन असे दिसत होते की, शून्यावर बाद झाल्याचा वचपा फॅन्स वर काढतोय, ज्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. इतकंच नाही तर सलग दुसऱ्या मॅचमध्ये अपयशी ठरल्यानं आझम खानला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केलं जात आहे.
महत्तवाच्या बातम्या-
पाकिस्ताननं अमेरिकेला हलक्यात घेतलं का? बाबर आझमनं सांगितलं धक्कादायक पराभवामागचं कारण
“ही इतिहासाची पुनरावृत्ती…”, अमेरिकेविरुद्ध पाकिस्तानच्या लाजिरवाण्या पराभवानंतर शोएब अख्तर भडकला!
साहेबांच्या खेळात भारतीयांची मक्तेदारी! टी20 विश्वचषकात दुसऱ्या देशाकडून खेळणारे भारतीय वंशाचे क्रिकेटपटू