---Advertisement---

आझम महिला क्रिकेट टी-२०स्पर्धा : आझम स्पोर्ट्स अकादमी, मेट्रोइट्स, जनादेश, एच पी रॉयल्स संघ उपांत्य फेरीत

On: गुरूवार, फेब्रुवारी 17, 2022 8:34 AM
Bhavika-Ahire
---Advertisement---

पुणे। बुधवारच्या लढतीत रायझिंग डे व पीएमपी संघांनी प्रतिस्पर्धी संघांना पराभूत केले असले तरी या दोन्ही संघ आझम महिला टी – २० क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करू शकले नाहीत. आझम स्पोर्ट्स अकादमी, मेट्रोइट्स, जनादेश व एच पी रॉयल्स संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

बुधवारी आझम स्पोर्ट्स अकादमीच्या मैदानावर झालेल्या लढतीत रायझिंग डे संघाने पीडीसीए संघाला ४८ धावांनी पराभूत केले. अक्षया जाधवच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर रायझिंग डे संघाने निर्धारित २० षटकांत ४ बाद १४५ धावापर्यंत मजल मारली. अक्षया जाधवने ६१ चेंडूत ६ चौकारांच्या सहाय्याने ७० धावांची खेळी केली. तिला इरा जाधवने ४१ (३८ चेंडू, ४ चौकार) स्वरा कुवळेकरने २० (३ चौकार) धावांची खेळी केली. पार्वती बकाले, अनिशा स्वामी व दिया यादव यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

पीडीसीए संघाला निर्धारित २० षटकांत ६ बाद ९७ धावाच करता आल्या. पीडीसीए संघाकडून अमिषा स्वामी हिने सर्वाधिक २९ (३६ चेंडू, ५ चौकार) धावा केल्या. अमिषा पाटीलने २१ तर भानवी कपाले हिने ११ धावा केल्या, परंतू त्या संघाला पराभवापासून वाचवू शकल्या नाहीत. शलाका काणेने २ तर सई चव्हाण, सृष्टी सूर्यवंशी व अक्षया जाधव यांनी प्रत्येकी १ गडी गडी बाद केला. अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या अक्षया जाधवला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

दुसऱ्या लढतीत पीएमपी संघाने ए के स्पोर्ट्स संघाला ६८ धावांनी मात दिली. पीएमपी संघाने निर्धारित २० षटकांत ५ बाद १४९ धावा केल्या. आयेशा शेखने नाबाद ८३ धावांची दमदार खेळी १५ चौकारांच्या सहाय्याने सजविली. तिला माधुरी आघावने २१ (४ चौकार) धावा करताना सुरेख साथ दिली. अदिती जोशीने ३ गडी बाद केले. अनन्या दर्शाळे व धनलक्ष्मी खाटके यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.

लढतीच्या उत्तरार्धात ए के स्पोर्ट्स संघाला १५० धावांचे आव्हान पेलवले नाही. निर्धारित २० षटकांत ५ बाद ८१ धावा करता आल्या. भाविका अहिरेने संथ खेळी करताना ५३ चेंडूत ४२ (६ चौकार) धावा केल्या. तिला सुहानी कहंडळने २५ (५ चौकार) धावा केल्या. प्रिया कोकारेने ३ तर चिन्मयी बोरफळेने २ गडी बाद केले. नाबाद ८३ धावांची आक्रमक खेळी करणाऱ्या आयेशा शेखला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

आझम स्पोर्ट्स अकादमी संघाने अ गटातील साखळी लढतीपैकी तीन लढती जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. एच पी रॉयल्स संघाने देखील त्याच गटातून दोन लढती जिंकताना उपांत्य फेरी गाठली. ब गटातून मेट्रोइट्स संघाने ३ लढती जिंकून उपांत्य फेरीत गाठली असून याच गटात जनादेश संघाने तीन पैकी २ लढती जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला. उद्या आझम संघासमोर जनादेश संघाचे तर एच पी रॉयल्स संघासमोर मेट्रोइट्स संघाचे उपांत्य फेरीत आव्हान असणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

मित्रप्रेम की योगायोग? १७ फेब्रुवारी डिविलियर्स आणि डू प्लेसिससाठी खास दिवस

टेस्ट इनिंग्स स्पेशल भाग ४- शैलीच्या विपरीत खेळत डिविलीयर्सने २२० चेंडूत ३३ धावा केल्या, परंतू क्रिकेटरसिकांच्या हृदयात…

चेन्नईयन एफसी व ओदिशा एफसी यांच्यातला सामना बरोबरीत सुटला!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---