भारतीय संघाचे माजी क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर (r sridhar) यांच्या मते भारताचे माजी दिग्गज खेळाडू मोहम्मद अजहरुद्दीन (Mohammad Azharuddin) जर आज भारतीय संघात खेळत असते, तर ते उत्कृष्ट क्षेत्ररक्षक असते. माजी प्रशिक्षक श्रीधर यापूर्वी मोहम्मद अजहरुद्दीन यांसोबत हैदराबाद संघासाठी खेळले आहेत, त्यामुळे त्यांना अजहरुद्दीन यांच्या क्षेत्ररक्षणाविषयी चांगली माहिती आहे. अजहरुद्दीन त्यांच्या काळात भारतीय संघाचे कर्णधार आणि महत्वाचे अष्टपैलू खेळाडू होते.
भारतीय संघाच्या क्षेत्ररक्षक प्रशिक्षकाच्या रूपात श्रीधर यांनी अष्टपैलू रवींद्र जडेजासोबत काम केले आहे. जडेजा सध्याच्या भारतीय संघातील सर्वश्रेष्ठ क्षेत्ररक्षकांपैकी एक आहे. अशात श्रीधर यांना मोहम्मद अजहरुद्दीन आणि रवींद्र जडेजा यांच्यातील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक कोण? असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचे उत्तर देताना श्रीधर म्हणाले की, “दोघे वेगवेगळ्या युगातील आहेत आणि क्षेत्ररक्षणाच्या पातळीत बदल झाले आहे. तर अशात निवड करणे कठीण आहे.”
“८० च्या दशकात जेव्हा अज्जू भाईने पदार्पण केले होते, तेव्हा भारतीय क्रिकेटमध्ये फिटनेसची कसलीच परंपरा नव्हती. ही परंपरा ९० च्या दशकाच्या शेवटी सुरू झाली आणि अज्जू भाई त्यांच्या तंदुरुस्तीच्या कारणास्तव सर्वापेक्षा वेगळे होते. कारण, त्यांचे हात आणि थ्रो अप्रतिम होता. त्यांनी त्यांचा वेगळा ठसा उमटविला होता,” असे श्रीधर पुढे बोलताना म्हणाले.
जडेजाला क्षेत्ररक्षण करताना पाहून चांगले वाटते असे श्रीधर म्हणाले. तसेच आजच्या संघात अजहरुद्दीन यांनी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केले असते असेही त्यांनी सांगितले. श्रीधर पुढे बोलताना म्हणाल की, “जडेजा जेव्हा चेंडूच्या मागे धावतो, तेव्हा त्याला पाहून चांगले वाटते. तो जगातील इतर खेळाडूंपैकी वेगळा आहे. अजहर देखील त्यांच्या काळात वेगळे होते. १९८५ ते १९९० च्या वेळेतील अजहर आज अप्रतिम क्षेत्ररक्षक असते. मग ते स्लिपमध्ये असोत किंवा सीमारेषेजवळ थांबलेले असो.”
श्रीधर यांच्यामते, अजहरुद्दीने त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत एकदम तंदुरुस्त होते आणि कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात देखील त्यांनी त्यांचा फिटनेस कायम ठेवलेला. शेवटच्या काही दिवसांमध्ये त्यांनी काही अप्रतिम झेल घेतले आणि काही फलंदाजांना धावबाद देखील केले होते. श्रीधर यांनी सांगितल्याप्रमाणे राहुल द्रविड आणि वीवीएस लक्ष्मण यांच्यानंतर भारतीय संघात स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करण्यासाठी चांगल्या खेळाडूंची कमतरता होती. पण त्यांच्या मार्गदर्शनात चेतेश्वर पुजार आणि रोहित शर्मा हे या विभागात क्षेत्ररक्षण करण्यासाठी तयार झाले आहेत.
महत्वाच्या बातम्या –
असे ४ वर्षांपूर्वी थाटामाटात पार पडले होते विराट-अनुष्काचे लग्न, पाहा खास फोटो अन् व्हिडिओ
ऋतुराजची शतकांची हॅट्रिक! महाराष्ट्राचे नेतृत्त्व करताना विजय हजारे ट्रॉफीत पाडलाय धावांचा पाऊस