केरळचा युवा यष्टीरक्षक मोहम्मद अझरुद्दीन मागील काही काळापासून चांगलाच चर्चेत आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीतील शतक व आयपीएल लिलावामुळे तो प्रसिद्धीझोतात आला होता. सध्या अझरुद्दीन पुन्हा एकदा चर्चेत आला असून, त्याचा एका स्थानिक स्पर्धेतील एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.
सुपरमॅन अझरुद्दीन
केरळ येथे सध्या प्रेसिडेंट टी२० चषक स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत अझरुद्दीनने केलेल्या एका अफलातून धावबादचा व्हिडिओ पुढे आला आहे. केसीए ईगल्स विरुद्ध केसीए टस्कर्स विरुद्धच्या सामन्यातील हा व्हिडिओ असून, त्याला चाहत्यांची पसंती मिळत आहे.
टस्कर्सच्या फलंदाजाने कव्हर्समध्ये मारलेला चेंडू क्षेत्ररक्षक रॉबिन कृष्णनने यष्टीरक्षक अझरुद्दीनकडे फेकला. चेंडू यष्ट्यांपासून दूर जात असलेला पाहून अझरुद्दीनने चित्त्याच्या चपळाईने हवेत सूर मारत चेंडू पकडला व श्रीनाथ के या फलंदाजाला धावबाद केले. त्यामुळे, ईगल्सच्या खात्यात बळी जमा झाला. त्याचेही चपळाई आणि तंदुरुस्त पाहून आयपीएलमध्ये त्याचा कर्णधार असलेला विराट कोहली नक्कीच खूश होईल.
RCB's azharudeen wicket keeping skills😍🔥
He also scored 69(43) at 160 strike rate. #KeralaT20 #RCB #IPL2021 https://t.co/WoVnZdU6gm
— ɯlse (@pitchinginline) March 15, 2021
केरळचा सलामीवीर आहे अझरुद्दीन
भारताचे महान खेळाडू मोहंमद अझरुद्दीन या नावाशी साधर्म्य असलेला हा खेळाडू सलामीवीर व यष्टीरक्षक अशी दुहेरी भूमिका संघासाठी बजावतो. या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या मुंबई विरुद्ध साखळी सामन्यात त्याने अवघ्या ५२ चेंडूमध्ये १३७ धावांची तुफानी खेळी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
आरसीबीचा बनला भाग
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये केलेल्या चमकदार कामगिरीचे बक्षीस म्हणून त्याला आयपीएल लिलावात मिळाले. चेन्नई येथे २०२१ आयपीएलसाठी झालेल्या लिलावात विराट कोहलीच्या नेतृत्वातील रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाने २० लाखांची बोली लावत त्याला आपल्या संघात सामील करून घेतले. तो प्रथमच आयपीएलमध्ये सहभागी होईल. अझरुद्दीनने आपल्या कारकीर्दीत आत्तापर्यंत २४ टी२० सामने खेळताना २२.५५ च्या सरासरीने ४५१ धावा काढल्या आहेत. विशेष म्हणजे त्याचा स्ट्राईक रेट तब्बल १४२.२७ इतका तगडा आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
ऍस्टलचे ‘ते’ तडाखेबंद द्विशतक आठवतय का? १९ वर्षापासून कोणीही मोडू शकला नाही तो विक्रम
रिषभ पंतच्या रनआउटवरून चाहत्यांमध्ये रणकंदन, होतेय जोरदार चर्चा
रोहितचा अप्रतिम झेल आणि प्रशिक्षकांची शिट्टी, पाहा खास व्हिडिओ