---Advertisement---

टी२० विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठल्यानंतरही ‘या’ बाबतीत पाकिस्तानी कर्णधार बाबर आझम संघावर नाखूष

On: बुधवार, नोव्हेंबर 3, 2021 5:47 PM
Babar-Azam
---Advertisement---

कर्णधार बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान संघाची कामगिरी सध्याच्या टी२० विश्वचषक स्पर्धेत उत्कृष्ट राहिली आहे. पाकिस्तान संघाने स्पर्धेच्या उपांत्य फेरीतही प्रवेश केला आहे. मंगळवारी (२ नोव्हेंबर) या संघाने नामिबियाचा ४५ धावांनी पराभव केला. संघाचा हा सलग चौथा विजय असला तरी कर्णधार बाबर आझम अजूनही संघावर खूश झालेला नाही. नाबिमियाविरुद्ध संघाचे क्षेत्ररक्षण चांगले नव्हते. यामुळे पाकिस्तान संघाचा कर्णधार संतापला आहे. सुपर १२ साखळी सामन्यात पाकिस्तान संघाची अंतिम लढत ७ नोव्हेंबरला स्कॉटलंडशी होणार आहे.

बाबर आझम सामना संपल्यानंतर म्हणाला, ‘दव असल्यामुळे क्षेत्ररक्षणात काही अडचण आल्या. पण हे काही योग्य कारण नाही. आम्हाला अधिक चांगले करावे लागेल.’

मात्र, संघातील फलंदाज आणि गोलंदाज नियोजनानुसार खेळले. ज्येष्ठ फलंदाज मोहम्मद हाफीज आणि वेगवान गोलंदाज हसन अली यांना पहिल्या तीन सामन्यांमध्ये फारशी चांगली कामगिरी करता आली नव्हती. पण दोघेही नामिबियाविरुद्ध चांगले खेळले. यावर बाबर म्हणाला की, ‘दोन्ही खेळाडू संघासाठी महत्त्वाचे आहेत. येत्या सामन्यांमध्येही ते अशीच कामगिरी कायम ठेवतील, अशी आशा आहे.’

नामीबियाविरुद्धच्या सामन्यात बाबर आझमने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावर तो म्हणाला की, ‘आम्ही एका योजनेनुसार सामन्यात उतरलो होतो. आम्हाला चांगली सुरुवात करायची होती आणि सामन्यातही अगदी तसेच झाले. शेवटच्या षटकात इतर फलंदाजांनी झटपट धावा केल्या.’

उपांत्य फेरीबाबत तो म्हणाला की, ‘आम्हाला आमचा खेळ असाच सुरू ठेवायला आवडेल.’ पाकिस्तानच्या संघाने २००९ मध्ये पहिला आणि एकमेव टी-२० विश्वचषक जिंकला होता. यावेळीही हा संघ दावेदार मानला जात आहे. संघाने विक्रमी पाचव्यांदा उपांत्य फेरी गाठली आहे.

नामीबियाविरुद्धच्या सामन्यात मोहम्मद रिझवानला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. तो म्हणाला की, सुरुवातीला धावा करणे कठीण होते. यामुळे बाबर आणि मी ठरवले की आपण डाव हळू हळू पुढे नेऊ आणि आम्हाला याचा फायदा झाला.’

बाबर आणि रिझवानमध्ये पहिल्या गड्यासाठी ११३ धावांची मोठी भागीदारी झाली. रिझवानने शेवटच्या षटकात २४ धावा केल्या. यामुळे संघाला १८९ धावा करण्यात यश आले. बाबर आझमने ४९ चेंडूत ७० तर रिझवानने ५० चेंडूत नाबाद ७९ धावा केल्या. आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये रिझवानने यावर्षी १० डावात ५० हून अधिक धावा केल्या आहेत. हा एक विक्रम आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

नव्या टी२० क्रमवारीत बाबरची बादशाहत; हसरंगा गोलंदाजीत ‘नंबर वन’

‘हा या चेंडूवर बाद होणार’, रिझवानने केली भविष्यवाणी अन् खरंच फलंदाज झाला बाद, पाहा व्हिडिओ

कहर कामगिरी! टी२० सामन्यात ८ पेक्षा कमी चेंडू खेळूनही ‘मॅन ऑफ द मॅच’ बनणारे ३ फलंदाज

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---