पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आणि यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान यांनी बुधवारी (9 नोव्हेंबर) मोठी भागीदारी करत संघाला उपांत्य सामन्यात विजय मिळवून दिला. न्यूझीलंडविरुद्धच्या या सामन्यात पाकिस्तानने 7 विकेट्स राखून विजय मिळवला आणि अंतिम सामन्यात धडक घेतली. बाबर आणि रिझवान यांनी 105 धावांची भागीदारी संघाच्या विजयासाठी महत्वाची ठरली, पण त्यांनी या प्रदर्शनाच्या जोरावर खास विक्रम देखील नावावर केला.
टी-20 विश्वचषकाचा उपांत्य सामना म्हणजे कोणत्याही संघासाठी महत्वाचाच असतो. अशा या महत्वाच्या सामन्यात बाबर आझम (Babar Azam) आणि मोहम्मद रिजवानने (Mohammad Rizwan) पाकिस्तानसाठी शतकीये भागीदारी केली आणि संघाला अंतिम सामन्यापर्यंत घेऊन गेले. बाबर आणि रिझवानने यांनी या सामन्यात 76 चेंडूत 105 धावांची भागीदारी केली. टी-20 विश्वचषकात उपांत्य सामन्यात केली गेलेली ही सर्वात मोठी भागीदारी ठरली आहे. यापूर्वी टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात जॉन्सन चार्ल (J Charles) आणि लेंडल सिमन्स (Lendl Simmons) यांनी 2016 साली सर्वात मोठी भागीदारी केली होती. तेव्हा वेस्ट इंडीज संघ उपांत्य सामन्यात भारतासमोबत खेळत होता. चार्ल आणि लेंडल सिमन्स यांनी या सामन्यात 97 धावांची भागीदारी केली होती.
टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यातील सर्वात मोठ्या भागीदारी –
मोहम्मद रिजवान आणि बाबर आझम – 105 विरुद्ध न्यूझीलंड (2022)
जोन्सन चार्ल आणि लेंडल सिमन्स – 97 विरुद्ध भारत (2016)
दरम्यान, पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील बुधवारी खेळल्या गेलेल्या सामन्याचा विचार केला, तर न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मर्यादित 20 षटकांमध्ये त्यांनी 4 विकेट्सच्या नुकसानावर 152 धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानने 19.1 षटकात आणि 3 विकेट्सच्या नुकसानावर विजय मिळवला. पाकिस्तानसाठी कर्णधार बाबरने 42 चेंडूत 53 धावा केल्या. तसेच रिझवानने 43 चेंडूत 57 धावा केल्या. या दोघांव्यतिरिक्त तिसऱ्या क्रमांकावर आलेला मोहम्मद हॅरिस 30 धावा करून बाद झाला. तत्पूर्वी न्यूझीलंडसाठी कर्णधार केन विलियम्सन याने 46, तर डॅरिल मिचेल 53 धावा करून बाद झाले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बाबर अन् रिझवानने भल्याभल्यांना दाखवली आपली ताकद, टी20 विश्वचषकाच्या ‘या’ विक्रमात बनलेत टेबल टॉपर
संमतीशिवाय लैंगिक संबंध ठेवल्याच्या आरोपात श्रीलंकन खेळाडू अटकेत, आता बोर्ड म्हणतंय, ‘आम्ही उचलणार खर्च’