पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझमचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओ मध्ये बाबर आझम आपल्या फिटनेसवर मेहनत करताना दिसत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये पाहिले जाऊ शकते, तो लाहोर मध्ये असलेल्या एनसीए मध्ये उस्मान कादिर सोबत जोरदार रनिंग रेस करताना दिसत आहे. पाकिस्तानच्या कर्णधाराने घेत असलेल्या या मेहनतीवर पाकिस्तानी चाहते त्याच्यावर खूप आनंदी आहेत आणि काैतुक करत आहेत.
सांगू इच्छितो, बाबर आझमची तुलना नेहमीच भारताचा दिग्गज विराट कोहलीशी होत असते. पण वास्तविकतेमध्ये बाबरला कोहलीच्या बरोबरीने समजणे, हे अयोग्य ठरेल. कारण विराट कोहलीने आपल्या कामगिरीने जगभर नाव कमावले आहे. कारण विराट कोहलीने अनेक वर्षापासून सातत्याने कामगिरी करुन जागतिक क्रिकेटमध्ये नाव कमावले आहे. बाबरने त्याच्या उत्कृष्ट फलंदाजीमुळे फार कमी वेळात खूप प्रशंसा मिळवली आहे, पण त्याला अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. अशा परिस्थितीत तो डाउन फॉलच्या वेळी स्वत:ला कसा हाताळतो हे पाहणे खूप मनोरंजक असेल.
Babar Azam and Usman Qadir working on the fitness at NCA, Lahore.#Cricket | #Pakistan | #BabarAzam | #UsmanQadir | #Lahore pic.twitter.com/RhRNuFnS0Q
— Khel Shel (@khelshel) July 20, 2024
बर तरं, बाबर आझमला विश्व क्रिकेटमध्ये विराट कोहली सारखे नाव कमवायचे असेल तर किंग कोहली सारखे फिटनेसवरही मेहनत करावे लागेल. बाबरचे सध्याचे प्रयत्न पाहता भविष्यात जगावर वर्चस्व गाजवण्याची त्यांची इच्छा आहे असे दिसते.
विराट कोहलीच्या क्रिकेट करिअरबाबत बोलायचे झाले तर विराट कोहलीने 292 एकदिवसीय साामने खेळला आहे. ज्यामध्ये 13848 धावा केल्या आहेत. ज्यात 50 शतकांचा समावेश आहे. तर टी20 मध्ये कोहलीने 125 सामने खेळला आहे. ज्यामध्ये 4188 धावा केल्या आहेत. तर कसोटी मध्ये विराटने 133 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये 8848 धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
क्रिकेटच्या मैदानात चक्क कोल्होबाची एंट्री! सैरभैर धावून केलं प्रेक्षकांचं मनोरंजन, एकदा VIDEO पाहाच
“तू माझ्यासाठी सर्वकाही आहेस”, वाढदिवसानिमित्त बॉयफ्रेंडची स्मृती मंधानासाठी प्रेमळ पोस्ट
आयपीएल 2025च्या मेगा लिलावापूर्वी दिल्ली कॅपिटल्स रिषभ पंतला सोडणार?